संदेश

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ८.निसर्ग Written by सौ. शुभांगी रानडे

साहवेना बाई मला
शिशिरातील पानगळ
पेलवेना डोईवरी
भलेथोरले आभाळ ---- १

ग्रीष्मातली हाय हाय
कशी काय सांगू माय
सांगून तुला कध्धी खरं
वाटायचं नाही बरं ---- २

शरदाच्या चांदण्याची
रीतच न्यारी
मनाच्या चोरकप्प्यात
अलगद उतरी ---- ३

वर्षाऋतूत बरसतात
सरीवर सरी
हात गुंफून हातात
कोसळती जरी ---- ४

दिवस कसा सरतो
कळत मला नाही
तुझ्या सयीशिवाय
घास उतरत नाही ---- ५

मेघराजा संदेशाला
नीट ठेव ध्यानात
दूर माझ्या माईच्या
जाऊन सांग कानात ---- ६

Hits: 172
X

Right Click

No right click