चांदणं
पुनवेचं चांदणं गगनात
अन् प्रकाश पडलाय दरियात
चांदणं आयलय हातात
अन् लाज वाटे मला बाई मनात ---- १
चंदेरी मासोळी आली पाण्यात
अन् गोड गोड खळी माझ्या गालात
गवसली गं माझ्या जाळयात
अन घेऊन निघाले मी तो-यात ---- २
समिंदरा रे समिंदरा
घेऊन चल मला माझ्या घरा
जाईन मी लाटांच्या संगतीत
अन् वाळूत पावले रेखीत ---- ३
Hits: 174