आभाळमन
दुस-याला चांगले म्हणायला
आभाळाएवढे मन लागते
विद्येच्याही जोडीला
संस्काररूपी धन लागते ---- १
अनमोल हि-यालाही
सुवर्णाचे कोंदण लागते
नुसती ऐश करायलाही
खिशामध्ये छन्छन् लागते ---- २
उच्च ध्येय गाठायचे तर
मनाशी खूण बांधावी लागते
सुख हवे असेल तर
दु:ख पचवून टाकावे लागते ---- ३
परमेशाच्या प्राप्तीला
भक्तीत रंगून जावे लागते
पांडुरंगाच्या भेटीला
संसार सोडून जावे लागते ---- ४
Hits: 176