प्रतिमा

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ६.काव्य Written by सौ. शुभांगी रानडे


जिकडे पहावे तिकडे मजला
काव्य काव्य अन् काव्य दिसे
काय करावे उमगत नाही
वाटे मज लागले पिसे ---- १

स्वच्छंदी या वाऱ्यासंगे
होउनि मयूरपंखी पिसे
मन हे माझे लहरत जाई
ठाऊक नाही कुठे कसे ---- २

पुनवेच्याही राती चांदण्या
चंद्र नभीचा तो विलसे
पाहुनि त्या सागरास वाटे
चांदा भेटू कुठे कसे ---- ३

उत्तुंग रुपेरी हिमालयाचे
भव्य रुप ते सुंदरसे
हिरव्या मखमली तृणावरीही
मन माझे अडकून बसे ---- ४

चराचरातील विविध छटामधि
परमेशाचे रूप दिसे
मनात माझ्या प्रतिमा त्याची
रूप घेऊनि बसलीसे ---- ५

Hits: 174
X

Right Click

No right click