आस
देवा तुझा ध्यास, लागलीसे खास
लागे मज आस, दर्शनाची //१//
देवा तुझ्या पायी , ठेविते मी डोई
आहे तुझ्या ठायी,भक्ती माझी //२//
देवा तुझा छंद , हाच माझा बंध
वाया हा सत्संग, जावो नये //३//
देवा तुझ्या नामी , लागे मज प्रीती
ठेवी माये माथी , कृपादृष्टी //४//
देवा तुझ्या दारी, कोणी ना भिकारी
प्रेमे जेऊ घाली, निजकरे //५//
Hits: 162