चिमुकली चिऊताई

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ३.बाल Written by सौ. शुभांगी रानडे

चिमुकली चिऊताई
कंटाळयाचे नाव नाही
पंखाचा पदर बांधून
एकसारखी कामाची घाई ---- १

काय खाऊ काय खाऊ
म्हणत असतात कावळे भाऊ
संपत नाही हट्ट
म्हणून झाले आहेत मठ्ठ ---- २

पोपटदादा हिरवागार
चोच याची बाकदार
तिखट्ट मिरची खातो
तरी गोड गोड बोलतो ---- ३

कुत्रोपंत आलात काय ?
शेपूट हलवून सांगतात काय ?
ताजी पोळी वरती साय
खूप आवडती म्हणताय काय ? ---- ४

Hits: 172
X

Right Click

No right click