स्वर्गसुख
स्वर्गसुख
सर्व नात्यांमध्ये मातेचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते. साधुसंत सुद्धा परमेश्वराला माऊलीच्या रूपातच बघतात.
असती जगती या किती नातीगोती
सर मातेपरि कुणा नसे हाती . . . १
साधुसंतजन सकल हेचि वदती
विठूरायाते माऊलीच म्हणती . . . २
दोन डोळयातुनी जळती दोन ज्योती
परि अंती परमेश एक बघती . . . ३
तूचि नसता जग शून्यवत् जाहाले
तुझ्यासाठी हे नयन भरूनी आले . . . ४
तुझ्या मूर्तीमधि विठूमाय भासे
सुख स्वर्गीचे आज खरे गवसे . . . ५
Hits: 216