सांगावा
सांगावा
मुलीच्या आठवणीने आईला बेचैनी येते तर आईच्या आठवणीने मुलीच्या जिवाची घालमेल होते. दोनही नात्यातली गहिराई मनात खोलवर रूजल्याने अनेक कवितांचा विषय बनली आहे.
कुणी माझ्या माहेरी धाडवा सांगावा
माय माऊलीच्या रूपे विठ्ठल भेटवा . . . १
आठवणी तिच्या मन उदास ते होता
काळवेळाचेही मज भान ना उरता . . . २
आसवांच्या महापुरी वाहुनी मी जाता
नेत्रसुख होई मग स्वप्नी ती भेटता . . . ३
बाळ ऐसी अक्षरे दो कानावरी येता
आंनदाचा पेला शिगोशीग भरूनी जाता . . . ४
जाईजुईकुंदलता बहर ये चित्ता
सुख सुख म्हणति तेचि सहजी येई हाता . . .५
Hits: 157