आठवणीचे पाणी
आठवणीचे पाणी
मायलेकीचे नाते फार नाजूक असते. आजकाल बऱ्याच मुली लग्न झाल्यावर परदेशात जातात. अशावेळी आईच्या मनाची बेचैनी फक्त आईलाच ठाऊक असते. केवळ मुलीच्या आठवणीने तिच्या डोळयात पाणी तरळते. आणि ते पाहणारा साक्षीदार फक्त एकच असतो. तो म्हणजे स्वयंपाकाचा कट्टा.
परदेशी वस्ती तुझी आनंदाअंगणी
मनाच्या तुळशीला घालते येथुनी आठवणीचे पाणी . १
गगनी भराऱ्या घेणाऱ्या पिलासि निरखी पक्षिणी
मूर्ती तुझी वसे तशी नयनकोंदणी . . . २
संसारासाठी दूर जाशी उपाधि घेऊनी
बालपणीच्या स्मृति ठेवी जपुनी माय मनी . . . ३
सुखी राहो बाळ गुणी विनती ईशचरणी
लेकीच्या ऐशा शुभचिंतनी जाय रंगुनी . . . ४
स्वयपाकाचा कट्टा जाणी, जाणी ना दुसरे कोणी
आठवणी आणिती किती नयनातुनी पाणी . . . ५
Hits: 149