चार दिन

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

चार दिन

लग्न झालेली मुलगी सवडीने चार दिवस माहेरी येते. अशावेळी त्या मुलीला व त्या आईवडिलांना त्या दिवसांचा आठवणीची पुरचुंडी जन्मभर पुरेशी होते.

माहेरचे दिन चार सखये
परिश्रमा परिहार सखये
माहेरचे दिन चार . . . धुर.

स्वर्गसुखाच्या राशीवरती
सुखे सखे तू जरी नांदसी
बाळपणीच्या आठवणी तव
परि आम्ही बेजार सखये
माहेरचे दिन चार . . . १

संसाराच्या वेलीवरती
मोहकशी दो फुले उमलती
सुमनांचा परि परिमल देई
सकलजगा आधार सखये
माहेरचे दिन चार . . . २

संसाराच्या हिंदोळयावरी
झुलता झुलता मना विचारी
मायतात जरि असती दूरी
मनोमनी आधार सखये
माहेरचे दिन चार . . . ३

Hits: 175
X

Right Click

No right click