परतावा
परतावा
नोकरीनिमित्त परदेशी गेलेल्या मंडळींना मातृभूमी खुणावत असते. कायमचे परदेशी न राहता आपण नक्कीच मायदेशी परत येणार असल्याचे त्यांचे सांगणे आहे. मातृभूमीची व नातेवाईकांची ओढ त्यांच्या शब्दातून व्यक्त होताना दिसते.
हॅलो हाय-फाय सोडुनी आम्ही सुस्वागत म्हणतो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . धु्र.
आपण अमुचि मातापितरे, आम्ही आपुली असू लेकरे
संस्कारच जे केले आपण, जपुनी त्या ठेवितो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . १
घरे तेथली असती सुंदर, सोयीसुविधा त्याही भरपूर
कायमच्या परि वास्तव्याचा, विचार ना करितो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . २
येथे येता इथले होऊ, आपुल्या संगे सुखात राहू
खुणावते हे घरटे आम्हा, पाठ न त्या दावितो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . ३
आनंदचि हा अतीव झाला, भेटूनि साऱ्या सग्यासोयऱ्या
चार दिवसचि राहू तेथे, लवकर परततो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . ४
कायमचे ना दूरही राहू, परतुनी आम्ही खचितचि येऊ
तोवरि फोन नि इमेलमधुनी संपर्का साधतो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . ५
Hits: 145