पुंडलीक
पुंडलीक
सुखात आणि दु:खातही मनाचा समतोल ढळू न देता आनंदी वृत्तीने राहणाऱ्या व्यक्ती विरळाच असतात. अशाच व्यक्तीविषयी मनात आलेले विचार व्यक्त करण्यासाठी हा कविताप्रपंच केला आहे.
आईची सेवा केली तुवा
पुंडलीकाच्यापरी
दु:खाची सल, मनात तरी
हसू चेहऱ्यावरी . . . ।।१ ।।
एकही क्षण कामाविण
घालविशी ना वाया
लहान थोर, आप्त इष्ट
साऱ्यांवरी माया . . . ।।२ ।।
स्मरणी असताी, संतजनांच्या
सांगितलेल्या गोष्टी
तवरूपाने, तेचि संत
पुन्हा जन्मा येती . . . ।।३ ।।
आनंदाच्या चांदण्या असती
जगती ठायी ठायी
परि नजर त्यासी शोधण्याची
नसे सकला ठायी . . . ।।४ ।।
दु:खाचे डोंगर शिरी असता
सदा सुखी राहणे
दुसऱ्या कोणा जमेल का हो
कधी असे वागणे? . . . ।।५ ।।
Hits: 160