प्रकरण ५ -जीवाणुविषयक मानके

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन Written by सौ. शुभांगी रानडे

जीवाणुविषयक मानके:
पाण्याची 'पेयता ' पारखत असताना ही मानके अत्यंत उपयुक्त असतात. पिण्याच्या पाण्याशी संबंधित असलेला महत्त्वाचा धोका म्हणजे वाहिंत मल वा मानवी विष्ठेमुळे होणारे संदुषण. अश्या तर्‍हेचे संदूषण अगदी 'ताजे ' असेल व संदूषण करणारे हे दूषित आजारामुळे पछाडलेले रोगी अथवा दूषित तापाच्या 'कारक-कोषिकांना-रोगाणूंना-आसरा देणारे वाहक असतील तर पाण्यात रोगाणू असण्याची शक्‍यता निर्माण होते. अशा त-हेने संदूषित झालेल्या पाण्याच्या सेवनामुळे रोग फैलावण्यास अधिक मदत होते. जेंव्हा मलात अथवा विष्ठेत रोगाणूंचे अस्तित्व असते तेव्हा त्यामध्ये त्यांच्याहीपेक्षा जास्त संख्येत, आंतड्यात नेहमीच वसती करून राहणारे सामान्य पण निरुपद्रवी 'आन्त्रनिवासी जीवाणूही ' असतात. या निरुपद्रवी जीवाणूंची पाण्यातील संख्या व त्यांचा रोगाणूंशी असलेले अनुपात सर्वसाधारणत: साठ हजारास एक असा असतो. या निरुपद्रवी जीवाणूंचे पाण्यातील, पाण्यातील अस्तित्व शोधणे सोपे आहे. रोगाणूंना शोधण्यापेक्षा तर बरेच सोपे! म्हणूनच अशा तर्‍हेच्या सामान्य आत्त्रिनिवासी जीवाणूंची पाण्यातील अनुपस्थिती रोगाणूंच्या अंनुपस्थितीची बर्‍याच निश्‍चित प्रमाणात हमी देऊ शकते. याच कारणांसाठी विष्ठेतील 'दण्डाकृती जीवाणू ' हे 'विष्ठा प्रदूषणाचे निदर्शक समजले जातात. विष्ठा प्रदूषणाचे निदर्शक जीवाणू म्हणजे ' इश्चेरिश्चिया कोली ' आणि कोलींचा संपूर्ण समाज वा समुच्चय. यांनाच अलिकडे 'विष्ठीय कोली' अशा सामान्य नामाने ओळखतात. हे कोली-समुच्चयातील जीवाणू पाण्याच्या संबंधात पाहुणे असल्याने त्यांना ' प्रदूषणाचे निदर्शक ' समजण्यात येते.

गेल्या २-३ दशकात 'विषाणू-रोगांचा ' प्रादुर्भाव चांगलाच जाणवू लागला आहे. १९५५-५६ साली दिल्लीत ज्या रोगाने धुमाकूळ घालून असंख्य निष्पाप मानवांचे बळी घेतले, (ज्यात मराठी भाषिकांना परिचित कवी बा. सी. मर्ढेकर हेही होते) तो काविळीचा रोग विषाणूपासूनच उद्भवला होता. या रोगांचा छडा लावण्यासाठी ' निदर्शक विषाणू कोषिकांची' माहिती विद्यमान शास्त्राला नसल्याने, त्यांच्या पाण्यातील उपस्थितीविषयी निश्चयात्मक रीतीने काहीही सांगता येत नाही. अशा वेळी विष्ठींय' कोलींची अनुपस्थिती व पाण्यातील अवशिष्ट क्लोरिन हीच सुरक्षिततेची हमी समजावी लागते.

जीवाणुश्यास्त्रीय दृष्टीने परीक्षण करून पाण्याची गुणवत्ता ठरविताना पाण्याचे (१) अनुपचारित पाणी, (२) उपचारित पाणी व (३) ग्रामीण पाण्याचे नमुने असे ढोबळमानाने तींन विभाग पाडता येतात. प्रत्येक पाण्याची गुणवत्ता पुढे दिल्याप्रमाणे पडताळून पाहण्यात येते .

(१) अनुपचारित पाणी.
कोंणत्याही महिन्यातील कोणत्याही नमुन्यात कोली. जीवाणूंचा अतिसंभाव्य अंक दर १०० मि. लि. मध्ये १० हून जास्त नसावा.
इ. कोली अनुपस्थित असतील तर क्वचित्‌ प्रसंगी दर १०० मि. लि. मध्ये हा अतिसंभाव्य अंक (MPN) २० पर्यंत “अनुमेय'' धरला जातो. मात्र अशा परिस्थितीत कोलोंचा MPN सातत्याने २० किवा त्याहून अधिक आढळल्यास पाण्यावर उपचार करणे अटळ असते.

(२) उपचारित पाणी.--जर प्रती १०० मि. लि. मध्ये कोली-जीवाणू संपूर्णतः अनुपस्थित असतील तर ते पाणी आदर्श समजावे. कोणत्याही एका महिन्यात गोळा केलेल्या व विश्‍लेषण झालेल्या ९० प्रतिशत नमुन्यांमध्ये कोली-जीवाणुंची अनुपस्थिती किंवा कोली-जीवाणूंचा MPN हा दर १०० मि. लि. ला १ पेक्षा कमी' असावा (म्हणजे शून्यच असावा). कोणत्याही एका नमुन्यात हा MPN प्रती १०० मि.लि. ला १० हुन अधिक नसावा व कोणत्याही दोन अनुक्रमिक नमुन्यात प्रती १०० मि. लि. ला ८---१० या मर्यादेत सातत्याने नसावा (आठपेक्षा कमी असावा).

(३) ग्रामीण नमुने---पाणी पुरवठ्यांच्या उद्गमांची सुरक्षितता , राखण्यात काळजी घेतलीं जावी. अनुपचारित पाण्यासाठी ठरविलेली मानके या बाबतीत कटाक्षाने पाळली जावीत.
ICMR ने प्रकाशित केलेल्या 'पाणीपुरवठ्यांसाठी निर्घारित केलेले गुणवत्ता दर्शक मानकांची पुस्तिका ', मालिका क्रमांक ४४, १९६२.

Hits: 146
X

Right Click

No right click