उपोद्धात - ६

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर Written by सौ. शुभांगी रानडे

शिंदे व भोसले यास इंप्रजांशी लढण्याचा प्रसंग भला तेव्हा त्यांनी हाळकरास सामील करून घेण्याविषयी यत्न करण्याची पराकाष्टा केली. तथापि त्या वेळा तो त्यांस अनुकूल झाला नाहीं; लढाईचा तमाशा पहात स्वस्थ राहिला. पण पुढच्याच वर्षी इंग्रजांच्या लढाईची बारी एकट्या होळकरावर येऊन बेतली तेव्हा तो संकटांत पडला ! आपणास साहाय्य करण्याविषयी मराठी राज्यांतल्या सर्व सरदारांस त्यानें पत्रे पाठविली होती. अश्या पत्रांपैकी परशुरामपंत प्रतिनिधीस त्यानें जे पत्र पाठविले त्यांत लिहिले आहे की, 'आजपर्यंत हिंदु राज्य सर्वांनी एकदिल राहून चालविले. अलीकडे ज्याचे त्याचे दौलतीत गृहकलह होऊन राज्यास विपर्यास घडून हिंदुधम॑ नाहींसा होण्यास मूळ झालें. याचें छेदन करण्यास सर्वत्र एकदिल आलें पाहिजे; तरच मूळाचें छेदन होऊन स्वधर्माचार पूर्ववत्‌ प्रमाणें चालून हिंदूंची कायमी राहील. इकडील क्रम जो आरंभिला आहे हाच यावत्देह चालवावा असें मनांत आहे. यांत परमेश्वर अनुकूल होऊन जे घडवील तें खरे! परंतु एकानेच असा प्रकार करून सर्वत्रांनी तमाशे पाहून आपापली दौलत सांभाळून असावें, यांतील परिणाम कसा हें मनी विचारून ज्यांत हिंदुधर्मांची कायमी व परिणामास नीट तें करावें ! याचा विचार तुम्ह्वांसारख्यांनीं न केला तरी दुसरे कोण करितील?' या पत्रांतले विचार फारच योग्य आहेत. पण ते आदल्याच वर्षी होळकरास सुचले असते व तो शिंदे-भोसल्यांस मनापासून हातभार लावता तर किती चांगले झाले असतें.

मराठ्यांनी परकी ठोकांचा तोफखाना, परकी लोकांचे कवायती अथवा आरबांसारखें अशिक्षित पायदळ, व बडे बडे परकी अंमलदार चाकरीस ठेवून त्यांच्या भरीवंर राज्याचा बवाव करण्याची अपेक्षा धरली ती कशी निष्फळ झाली याचें एवढा वेळपर्यंत विवेचन केलें. ह्याच पैकी ज्यांना ' मावळे ' अशी सामान्य संज्ञा होती त्या देशी पायदळावर खर्च करून व त्यांवर देशी अंमलदार नेमून तें पायदळ उजगारीला आणलें गेलें असतें तर त्याचा कांहीच उपयोग झाला नसता काय? पण ते पडले देशी ! ते कोणाच्या नजरेंत भरणार? पठाण, आरब, रोहिले, रांगडे यांना पगार सातपासून दहा रुपयेपर्यंत आणि मावळ्यांना पगार तीन किंवा चार रुपये ! परदेशी लोकांनी आमच्या मोहिमा कराव्या आणि मावळ्यांनी आमची कोठी, देवघर आणि बायका पोरे सांभाळावी. हेच मावळे इराण- दुराणांतल्या काबूल-कंदहारांतल्या कडव्या धिप्पाड जवानांना शिवाजीच्या काळांत काळाप्रमाणे भासले, आणि पेशवाईत तेवढे नादान ठरले, हें खर की काय? तसे म्हणावे तर हेच मावळे जगांत उत्कृष्ट लढवय्ये म्हणून नाणावलेल्या इंग्रज फ्रेंच वगैरे लोकांच्या खांद्यास खांदा भिडवून सांप्रतच्या महायुद्धांत बरोबरीने लढतात, थायी, जर्मनांससुद्धां चीत करूं शकतात, हेंही निदर्शनास आलेच आहे. योग्य उत्तेजन ब शिक्षण मिळाल्यास येथपर्यंत यांची पात्रता आहे हे पेशवाईत कोणास देखील खरें वाटलें नसतें ! यावर इंग्रज अंमलदार म्हृणतील की, हा महिमा मावळ्यांच्या मर्दुमकीचा नव्हे, अथवा त्यांच्या शिक्षणाचाही नव्हे. तें शिक्षण त्यांना आम्ही देतो, लढाईत आमच्या हुकमतीखाली यांचें सारे कामकाज होते, सबब या यशाचे मालक आम्ही आहों. पण पलटणींची मुख्य अंमलदारी देशी लोकांस मिळून ते लढाईत काय करू शकतात, हे पहाण्याची संधीच जर मुळी आम्हांला मिळत नाही, तर इंग्रज अंमलदार म्हणतात तेंच खरे, असें आम्ही तरी कां मानावे!

First Maratha War या शब्दांचा अर्थ ' इंग्रजांचे मराठ्यांशी पहिलें युद्ध ' असा होतो. परंतु हें इंग्रजांचे युद्ध सर्व मराठ्यांशी घडून आलें, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व मराठी साम्राज्याशी युद्ध झाले, असें मात्र मुळींच नाही. पेशवाई म्हणजे ' शिवशाही ' अथवा सर्व मराठो राज्य आहे, मात्र शिवशाहीचा तो एक मोठा भाग होय, हें आपण पुष्कळ वेळां विसरतों. सर्व मराठो साम्राज्यावर पेशव्यांची हुकमत चालावी असें शाहूनें ठरवून दिलें होतें खरे, पण त्या हुकमतीला कांही मर्यादा ठेवलेल्या होत्या, आणि त्या मर्यादांचे उल्लंघन पेशव्यांसही करतां येणें शक्‍य नव्हतें. शाहू मरण पावला तेव्हां राज्यांत पेशवे, भोसले, गायकवाड, आंग्रे, सावंत प्रतिनिधी, सचिव अक्कलकोटकर व आणखी कित्येक सरदार असून या सर्वांचे लहानमोठे पृथक्‌ पृथक्‌ सरंजाम होते. आपण मेल्यावर या सरदारांस कोणी शास्ता नाहीसा झाल्यामुळे हे सरकारचाकरी करणार नाहीत, राज्याची वाढ व उत्कर्ष होण्याचें बंद होईल, हे आपसांत भांडून राज्याचे वाटोळे करतील, असें मनांत आल्यावरून आपल्या मरणोत्तर सर्व राज्यावर देखरेख ठेवणारा कोणी अधिकारी नेमावा असा शाहूने विचार ठरविला. भोसले अथवा गायकवाड हे शाहूच्या नातीचे असल्यामुळें र्‍या दोघांपैकी कोणाच्या तरी गळ्यांत हें काम अडकडवून द्यावे असे त्याच्या मनांत होते. पण आपल्याच्याने पेशव्याशी स्पर्धा चालविणे होणार नाही असें समजून ते दोघेही त्या वेळी तो मुख्याधिकार पत्करण्यास धजले नाहींत मग शाहूने निरुपाय होऊनच राज्याची वडिलकी पेशव्याच्या हवाली केली; आणि त्यांस सनद दिलो की, तुम्ही सरकारी फौज व तिचे जेवढे म्हणून सरदार आहेत त्या सर्वांवर हुकमत चालवून राज्य सांभाळावें व परमुलुखी स्वाऱ्या कराव्या. सरंजामदारांच्या अंतर्गत कारभारांत तुम्ही हात घालूं नये, व जेथपर्यंत ते राज्याची इमानानें चाकरी करीत आहेत तेथपर्यंत त्यांच्या त्यांच्या सरंजामाचे मुलुख बिनबोभाट त्यांजकडे चालवावे. माझा चुलत भाऊ संभाजी यास कोल्हापूरचे संस्थान निराळे तोडून दिलें आहे तें त्याजकडे स्वतंत्र तसेंच राहूं द्यावे. इनाम वर्षासन नेमणुक वतन वगेरे जे जे म्हणून मी व माझ्या पूर्वजांनी दिलेलें आहे तें तें सर्व शिरस्त्याप्रमाणे ज्याचे त्याकडे चालवावे.

Hits: 98
X

Right Click

No right click