मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर
अमेझॉनने मराठी वापरण्यास नकार दिल्याने मनसेने खळखट्याक आंदोलन केले. एरवी पोलिसांत तक्रार करणा-या अमेझॉनने मनसेची माफी मागितलीअमेझॉनने मनसेची माफी मागितली ही बातमी वाचली आणि मनात विचार आला की हेच अमेझॉन उद्या आपल्या उद्योगांच्या मुळावर उठणार आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.
१९१८ मध्ये प्रसिद्ध झालेले न. चिं. केळकर यांचे मराठे व इंग्रज ( मराठेशाहीचें शतसांवत्सरिक वाडययश्राद्ध ) नावाचे पुस्तक वाचण्यात आले. त्यातील प्उपोद् घात प्रकरणात इतिहासकार श्री वासुदेवशास्त्री खरे यांनी मांडलेले विचार आजही लागू पडतात असे मला वाटते.
कोणत्या गुणांच्या अभावासुळें आम्ही इंग्रजांसारख्या युरोपियन राष्ट्रास कुंठित करूं शकलों नाही, असल्या राष्ट्राने टक्कर दिली असता ती सोसवण्याचें सामर्थ्य आमच्या राज्यांत कां राहिलें नव्हते, य़ाची मीमांसा एवढा वेळ करण्यांत आली. तिच्याच अंगत्वानें कारस्थानांच्या बाबतीत इंग्रजांस आम्हांवर कां यश मिळवितां आलें हे सांगणे ओघासच येते. मुबई व सुरत या बंदरांबाहेर इंग्रजांचा व्याप नव्हता, तेव्हांच देशाने त्यांस तेथून कां घालवून दिले नाही, हे आपले राज्य घेतील हें ओळखून हिंदी राजेरजवाड्यांनी या परकी लोकांस प्रथमपासून कां जरबेत ठेवलें नाहीं, इत्यादि प्रश्न उपस्थित करणारे लोक त्या वेळची वस्तुस्थिति लक्षांत घेत नाहीत. त्या काळांतल्या लोकांची ज्ञानमर्यादा सामान्यतः किती आकुंचित होती याचा विवार केला म्हणजे व्यापाराकरितां आपल्या देशांत आलेल्या त्या गोऱ्या! लोकांचे खरें स्वरूप घ्यानांत न आल्याबद्दह कोणासहि दोष देतां येत नाही. हे गोरे लोक व्यापारासाठी वखार बांधायला जागा मागतात, रुमालाने हात बांधून नम्रतेने उभे राहतात, पायांवर डोकें ठेवतात, इतकेंच त्या त्या हिंदी स्थानिक अंमलदारांच्या नजरेस पडले ते त्यांनी खरें मानलें.
या व्यापाऱ्यांना वखारीकरितां जागा दिली तर हे स्वतःकरितां आमच्या मुलखाची भली मोठी वखार बनवून टाकतील, ज्या रुमालाने त्यांनी स्वतःचे हात बांधले आहेत त्याच रुमालाने ते आमच्या मुसक्या आवळतील, हे आज पायांवर डोकें ठेवतात पण उद्यां आमच्या डोक्यावर पाय ठेवतील, असल्या विचित्र कल्पना ते स्थानिक अंमलदार. किती धूर्त असले तरी त्यांच्या मनांत कशा याव्या. व्यापाराचें निमित्त करून हेच इंग्रज युरोपखंडाच्या कोनाकोपच्यांत कोठेहि पाय ठेवते, तर हे कोण, कशाकरितां आले, ही चौकशी तत्काळ होऊन त्यांचें तेथून उच्चाटन झालें असते ! पण हिंदुस्थानच्या समुद्रेकिनाऱ्याबर इंग्रज वगैरे युरोपियन लोक किल्ले बांधून राहिले होते तरी शेपन्नास वर्षे त्यांजकडे कोणी दुंकून पाहिलें नाही ! याचे कारण हिंदुस्थान हा अफाट देश, त्यांत अठरापगड जाती, शिवाय त्यांतच मुसलमान, पारशी, ख्रिस्ती, ज्यू इत्यादि परथर्मी लोकांची खिचडी झालेली, शिवाय या देशांत शेंकडों राज्ये व हजारो संस्थाने अशा स्थितीत इंग्रज, फ्रेंच वगैरे अनोळखी लोक येथे येऊन राहिले तर ते खरोखर व्यापाराकरितां आले आहेत का. कशाकारिता आले आहेत याची चौकशी कोण करणार कोणाचें झाले तरी चालू व्यवहारावर लक्ष असणार, इंग्रज स्वतःस व्यापारी म्हणवतात तर त्यांनी व्यापारच करावा अधिक पंचाईत करण्याचे काय कारण? त्यांनी किल्ले बांधले म्हणून संशय घ्यावा तर कोणीहि लुंगासुंगा पाळेगार गढ्या ठाणी बळकावून धटाईच्या गोष्टी सांगतच असतो; त्यांतलेच हे ! असलेच विचार कोणाच्याही झाले तर मनांत येणार. त्यांतून इकडच्या राजेरजवाड्यांस या परकी लोकांशी स्नेह्भावानें वागणेंच अधिक फायदेशीर वाटत होतें. कारण, या परकी लोकांच्या व्यापारामुळे आपलें जकातीचे उत्पन्न वाढतें, लागेल तो परदेशी जिन्नस हे आणून देतात, आणि सर्वात मुख्य गोष्ट ही का, हे उत्तम गोलंदाज व उत्तम लढवय्ये असून शिवाय स्नेहाखातर तोफा व दारूगोळा विकीत असल्यामुळे संकटाच्या वेळा यांचा मोठाच उपयोग होण्याजोगा होत.
--- या पुस्तकातील सर्व लेख मायमराठीवर प्रसिद्ध करण्याचा विचार आहे.
सध्या भारतात परदेशांतून प्रचंड धनदौलत असणा-या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात उद्योगवाढीसाठी येत आहेत आणि आपण त्याचे स्वागत करीत आहोत. मात्र भविष्यात आपला देशही नव्या आंतरराष्ट्रीय गुलामगिरीत जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. सुदैवाने आज आपला भारत देश एकसंध असून भारतात ऐक्य व सुशासन आहे परंतु आपले उद्योग संरक्षित, सक्षम व आधुनिक केल्यासच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
Hits: 133