५. ट्रेड युनियन चळवळीतील कार्य

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

२. ट्रेड युनियन चळवळीतील कार्य

राजकीय कार्य हे एस्‌. एम्‌. जोशींच्या जीवनाचे प्रधान अंग होते. परंतु केवळ संसदीय कार्य वा सत्तेचे राजकारण यांनाच महत्व आहे, असे एस्‌. एम्‌. यांनी मानले नाही, राजकीय कार्य हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे. अशी एस्‌. एम्‌ ची भूमिका होती. आपल्या समाजातील विषमता कमी झाली पाहिजे, लोकांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण झाले पाहिजे, यासाठी प्रस्थापित धनिक वर्गाशो सतत संघर्ष करावा लागणारच, याची एस्‌. एस्‌. यांना तीव्र जाणीव होती. हा संघर्ष संघटित कामगार वर्ग प्रभावीपणे करू शकेल हे एस्‌. एम्‌. अनुभवातून शिकले. समाजवादी होण्यापूर्वांच एस्‌. एम्‌. यांचा या कामगार चळवळीशी संबंध आला होता. १९३० साली जी. आय्‌. पी. रेल्वेच्या संपामध्ये पुणे विभागाचे मार्गदर्शन काकासाहेब गाडगीळ करीत होते. काकासाहेब या वेळी यूथ लीगचे अध्यक्ष होते आणि एस्‌. एम्‌. यूथ लीगचे एक आघाडीचे कार्यकर्ते होते. म्हणून ते काकासाहेबांना हा संप लढविण्याच्या कार्यात मदत करू लागले. संप वशस्वी झाला नाही, परंतु एस्‌. एम्‌. यांना अनुभव मात्र खूप मिळाला आणि कामगार चळवळीशी त्यांचे नाते जुळले.

ट्रेड युनियन कार्याला सुरुवात

१९३० आणि १९३२ साली एस्‌. एम्‌. यांनी तुरुंगात कार्ल मार्क्सच्या ग्रंथांचे वाचन केले आणि ते विचाराने समाजवादी बनले. १९३४ साली अखिल भारतीय कापड कामगार परिषद मुंबईस भरली होती. त्या वेळी पुण्याच्या कामगारांचे प्रतिनिधी म्हणून एस्‌. एम्‌. यांनी मुंबईच्या परिषदेत भाग घेतला. १९३६ साली तुरुंगातून सुटून आल्यानंतर एस्‌. एम्‌. कामगारांच्या चळवळीत जाणीवपूर्वक भाग घेऊ लागले. पुण्यामध्ये तांब्या-पितळेची भांडी बनविण्याचे लहान लहान कारखाने होते. त्या कारखान्यातील कामगारांची संघटना दत्तोबा लाड यांच्या मदतीने एस्‌. एम्‌. यांनी बांधली आणि पगारवाढ व इतर मागण्यांसाठी या भांडी कामगारांनी संप केला. त्या वेळी जेधे बंधूंचा पुण्यात भांड्यांचा कारखाना होता. तरीदेखील केशवराव जेधे यांनी मध्यस्थी केल्यामुळे कामगारांच्या काही मागण्या मान्य झाल्या, दत्तोबा लाड हे मूळचे कुंडलचे धडाडीचे कार्यकर्ते होते. एस्‌. एम्‌. ची त्यांच्याशी दोस्ती जमली. दत्तोबा लाडांच्यामुळे एस्‌ एम्‌. विडी कामगारांच्या युनियनमध्येही काम करू लागले.

संरक्षण कामगारांची संघटना

स्वातंत्र्यपूर्व काळ्यत मिलिटरीच्या डेपोमधील कामगारांना युनियन काढण्याचा अधिकार नव्हता, स्वराज्य मिळाल्यानंतर तो मिळाला. पुण्यामध्ये अम्युनिशन फॅक्टरी आणि अन्य मिलिटरी डेपो होते. त्यांतील काही कामगारांनी नानासाहेब गोरे आणि विनायकराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामगारांना संघटित करून युनियन्स सुरू केल्या. अखिल भारतीय पातळीवर सुरुवातीस अरुणा असफअल्ली आणि पुढे जयप्रकाश नारायण डिफेन्स वर्कर्स युनियनचे अध्यक्ष झाले. एस्‌. एम्‌. यांनी नेतृत्व करावे, असा पुण्यातील कामगारांनी आग्रह धरला. त्यामुळे पाचशे बारा कमांड वर्कशॉप'च्या युनियनचे एस्‌. एम्‌. अध्यक्ष झाले. के. ओम्‌. मॅथ्यू या केरळमधून आलेल्या कामगार कार्यकर्त्यांची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. अधिकारी वर्गाला युनियन नको असल्यामुळे युनियनचा चिटणीस झालेल्या मॅथ्यूला आकसाने बडतर्फ करण्यात आले. एस्‌. एम्‌. या अन्यायाविरुद्ध उपोषणास बसले. एस्‌. एम्‌.च्या. उपोषणास नऊ दिवस झाल्यामुळे अच्युतराव पटवर्धन यांनी मध्यस्थी केली आणि सत्यशोधन कमिटी नेमल्यावर एस्‌. एम्‌. यांनी दहाव्या दिवशी उपोषण सोडले. सत्यशोधन समितीने मॅथ्यू यांना कामावर परत घेण्याची शिफारस केली आणि शासनाने ती स्वीकारली.

'युनियनचा विजय झाला' असे एस्‌. एम्‌. म्हणाले. तेव्हा मॅथ्यू त्याच सभेत म्हणाला, 'हा एस्‌. एम्‌. यांचाच नैतिक विजय आहे.' संरक्षण कामगारांची तीन फेडरेशन्स होती. एस्‌. एम्‌ ची भूमिका अशी होती की, ट्रेड युनियन चळवळीत कामगारांच्या हिताच्या आड राजकीय मतभेद येऊ देता कामा नयेत. त्यांनी त्यांची भूमिका आग्रहाने मांडली आणि तिन्ही फेडरेशन्स मिळून एक फेडरेशन निर्माण करण्यात आले. डॉ. मैत्रेयी बोस - अध्यक्ष, एस्‌. एम्‌. जोशी - जनरल सेक्रेटरी आणि कॉ. एस्‌. एम्‌. बॅनर्जी - सहचिटणीस झाले. यामुळे काँग्रिस, सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट असे तीन प्रवाह डिफेन्स कापगागंच्या चळवळीत एकत्र आले. पुणे आणि देहूरोड भागांतील डिफेन्स डेपोतील कामगारांच्या संघटनेकडेच एस्‌. एम्‌. यांनी मुख्यत: लक्ष दिले. ते सांभाळून ते इतरत्रही कामगार चळवळीत काही भाग घेत. १९६० साली केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांना महागाईच्या प्रमाणात महागाईंभत्ता मिळावा, अशी कर्मचार्‍यांची मागणी होती. यासाठी त्यांनी कौन्सिल ऑफ अँक्शन बनविले आणि एस्‌. एम्‌. त्याचे अध्यक्ष झाले. संप यशस्वी झाला नाही. हजारे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. य संदर्भात एस्‌. एम्‌. जोशी यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे, 'संप मोडल्यानंतर काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घ्यायला अधिकार्‍यांना राजी करणे हाच आमचा कित्येक दिवसांचा उद्योग होऊन बसला. आमची अगदी नामुष्की झाली. झोप येत नाही, अशी माझी कधीच तक्रार नसते; परंतु त्या वेळी एक दोन दिवस यला झोपही आली नाही.' मात्र संप यशस्वी झाला नाही तरी पंतप्रधान पं. नेहरूंनी इंग्लंडमधील व्हिटले कौन्सिलच्या धर्तीवर 'जॉअिंट कन्सल्टेटिव्ह कमिटी' अशी यंत्रणा तयार केली. त्यामुळे कामगारांच्या अनेक रास्त मागण्या मान्य झाल्या. एस्‌. एम्‌ जोशी यांनी दीर्घकाळ कामगार चळवळीत काम केले. या प्रदीर्घ अनुभवानंतर १९८२ साली कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यासमोर त्यांनी पुढील आशयाचे विचार मांडले :

चळवळीचे फलित

'संघटित कामगार चळवळीने कामगारांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करयला शिकविले आणि त्यांना अनेक बाबतींत न्याय मिळवून दिला. हे कामगार चळवळ संघटित करणाऱ्या कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांचे यश होते. आम्ही अनेकदा भांडवलदारांना तसेच शासनालाही नमवू शकलो. त्यामुळे कामगारांना आत्मविश्वास प्राप्त झाला आणि भांडवलशाहीला, आपण हवे तसे आणि हवे तितके शोषण करू शकणार नाही, हे समजून आले. परंतु हे मान्य केले पाहिजे की आम्ही कामगारांच्यात त्यांच्या कर्तव्याचा आणि समतेचा विचार रुजविण्यात अपुरे पडलो. सामाजिक समतेचा दृष्टिकोनही आम्ही कामगारवर्गात निर्माण करू शकलो नाही, एका व्यवसायात एक युनियन हे तत्त्व मान्य मान्य झाले असतें तर कामगारांना समाजवादी चळवळीचा व्यापक दृष्टिकोन देणे शक्य झाले असते, असे मला वाटते. परंतु कामगार संघटना एकमेकांपासून अलग राहिल्या. पुढे तर ट्रेड युनियन क्षेत्रातील राजकीय पक्षांनी आणि काही व्यक्तींनी ट्रेड युनियनचा उपयोग आपापले सत्ताकेंद्र असा केला. त्यामुळे ट्रेड युनियन्सचे मूळ स्वरूपच बदलले. ट्रेड युनियनने केलेले काम महत्त्वाचे आहे. परंतु या चळवळीतून व्यापक समतावादी आंदोलन निर्माण झाले नाही. कामगार हा क्रांतीचा अगदूत झाला नाही. हो कामगार चळवळीची अपूर्णता मान्य केलीच पाहिजे, असे मला वाटते'. एस्‌. एम्‌. यांच्या प्रांजळ भाषणानंतर ट्रेड युनियन क्षेत्रात त्यांच्यावर टीकाही झाली. त्यावर एस्‌. एम्‌. म्हणाले, 'इष्ट असेल ते बोलणार आणि शक्य असेल ते करणार, हे माझे ब्रीद आहे.'

Hits: 113
X

Right Click

No right click