१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

प्रकरण बारावे
१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - १

१) महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारकांचे दोन प्रवाह स्पष्ट दिसून येतात असे डॉ. धनंजयराव गाडगीळांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या डॉ. मॅथ्यूकृत इंग्रजी चरित्राच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. पहिल्या प्रवाहाचे अध्वर्यू होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यांचे व प्राचार्य गोपाळ गणेश आगरकरांचे सामाजिक सुधारणेचे कार्य शहरी उच्चवर्णीयांत होते व ते वैचारिक स्तरावर होते. मात्र या प्रवाहातले कर्ते पुरुष होते भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे. त्यांच्या कार्याचा कळस म्हणजे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था व नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ हे होय.

२) या प्रवाहाशी समांतर असा प्रवाह होता ग्रामीण समाजातील सुधारकांचा. त्यांच्या अग्रभागी होते महात्मा जोतीबा फुले. मात्र दुसर्‍या प्रवाहात होते अनेक कर्ते समाजसुधारक. त्यात महात्मा फुले व राजर्षी शाहू यांच्या सामाजिक सुधारणांना प्रादेशिक मर्यादा पडत होत्या. फुल्यांचे कार्य त्यांच्या हयातीत पुणे जिल्हा, मुंबई व नगर जिल्ह्याचा काही भाग यात पसरले. शाहू महाराजांना संस्थानाच्या मर्यादा पडत होत्या, पुढे मात्र या मयदिच्या पलीकडे जाण्याचे धाडस त्यांनी केले, पण त्यांना दीर्घायुष्य न लाभल्याने त्यांचे कार्य काही काळ खंडित झाले, मात्र मृत्यूपूर्वी दोन वर्ष त्यांनी अस्पृश्यांच्या व दलितांच्या सामाजिक सुधारणाची पताका सन १९२० साली माणगावच्या परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर दिली. इतर मध्यमवर्गीयांच्या, शेतकर्‍यांच्या बाबतीत हेच काम सत्यशोधकाच्या माध्यमातून सर्वश्री लठ्ठे, डोंगरे, भास्करराव जाधव यांच्यावर सोपविली. या सत्यशोधक समाजातील एक पायिक म्हणून भाऊरावांनी सामाजिक सुधारणेची पताका खांद्यावर घेतली.

पण जेव्हा हा समाज ब्राह्मणेतर पक्ष म्हणून राजकारणात सन १९२० साली उत्तरला; तत्पूर्वी एक वर्ष भाऊरावांनी ओळखले, को राजकारण हे आपले क्षेत्र नव्हे आणि सामाजिक क्षेत्र हे आपले खोर क्षेत्र आहे व त्यातल्या त्यात शिक्षण हे त्याच्या मर्मस्थानी आहे. भाऊरावांनी शिक्षण हे सामाजिक सुधारणाचे माध्यम डॉ. धोंडो. केशव कर्वे यांच्याप्रमाणे स्वीकारले व रयत शिक्षण संस्थेचा व पहिल्या वसतिगृहाचा जन्म काले गावी ४-१०-१९१९ रोजी झाला.

३) सन १९२२ साली मुंबई प्रांतातील शिक्षण खाते लोकनियुक्त मंत्री नामदार डॉ. रघुनाथराव परांजपे यांच्याकडे आले. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचेव सार्वत्रिक करण्याचा कायदा १९२३ साली केला. भाऊरावांनी हा कायदा पास होण्यासाठी डॉ. परांजप्यांच्या पाठीशी लोकमत आपल्या प्रचारसभातून उभे केले; तर महात्मा गांधींच्या ग्रामीण उद्योगधंद्याच्या संघटनेकडे भाऊराव सन १९२४ सालापासून आकर्षित झाले. ग्रामीण शिक्षण व ग्रामोद्वार याकडे भाऊरावांनी आपले लक्ष केंद्रित केळे. सन १९३२ साली पुण्यास सांगलीच्या राजेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली दुसरी ग्रामोद्वार परिषद भरली. या परिषदेत भाऊरावांनी भाषण करून तिसरी परिषद सातारा जिल्ह्यात किर्लोस्करवाडी येथे घेण्याचे रा. ब. रा. रा. काळ्यांच्या संमतीने जाहीर केले, व सन 9९३३ साली किर्लोस्करवाडीस ही परिषद भरली. या परिषदेची धुरा भाऊरावांनी स्वीकारली होती. फलटणचे राजेसाहेब अध्यक्ष व औंधचे राजेसाहेब स्वागताध्यक्ष होते. या परिषदेत भाऊरावांच्या शैक्षणिक व ग्रामोद्वाराच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती करण्यात आली व त्यांचे ग्रामीण जनतेवरील वजनही ओळखण्यात आले. (रयत शिक्षण संस्थेचा अहवाल; १९३५-१९३८, पृ. ४)

Hits: 98
X

Right Click

No right click