९. शिक्षणातील प्रयोग - १०
९. शिक्षणातील प्रयोग - १० ३०) अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते, डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि मुख्य प्रवर्तक होते विठ्ठलराव विखे पाटील. या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या आवारात र. . शि. संस्थेमार्फत म. गांधींच्या नावे माध्यमिक शाळा सुरू करण्याचे ठरले. किर्लोस्करवाडी व सातारा रोड येथे कारखान्याच्या मालकाकडून सहकार्य मिळाले नव्हते; पण प्रवरानगरला संचालक मंडळाने कारखान्यात गाळल्या जाणार्या उसाच्या प्रत्येक टनामागे पंचवीस पैसे शिक्षणासाठी र. शि. संस्थेस देणगीरूपाने द्यावयाचे ठरविले. संस्थेने कारखान्याच्या आवारात व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या प्रमुख खेड्यांत माध्यमिक शाळा मोफत चालवावी असे ठरले, मात्र कारखान्यात मुलांना अंशकालिक काम देण्याची भाऊरावांची योजना मान्य झाली नाही. म्हणून कारखान्याच्या आवारात बहुउद्देशीय शाळा व तंत्रनिकेतन सुरू करावे हे मान्य झाले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शाळांच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक व्यवस्थापन समिती नेमण्यात आली.
प्रवरानगरच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक (मी स्वत:) या समितीचे सचिव व श्री. विठ्ठलराव विखे अध्यक्ष होते. आज प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात तंत्रनिकेतन व बहुउद्देशीय शाळा आहे. प्रवरानगर येथील प्रयोगाचे अनुकरण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, गणेशनगर, अशोकनगर आदी सहकारी साखर कारखान्यांत झाले. र. शि. संस्थेमार्फत या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात माध्यमिक शाळा सुरू झाल्या.
३१) सन १९५१ साली प्रवरानगरला माध्यमिक शाळा सुरू करताना भाऊरावांची दृष्टी अशी होती को कारखान्याच्या परिसरातील मुलांना स्थानिक गरजेनुसार छोटीछोटी तांजिक पाठ्यक्रमे व प्रात्यक्षिके शिकवून मुलांना स्वावलंबी बनवावे. नोकरीसाठी त्यांनी इतर भटकू नये. कोठारी आयोगाने मान्य केठे होते की कारखान्यांनी आपल्या कारखान्यास उपयुक्त ठरतील अशा छोट्या पाठ्यक्रमाच्या व्यावसायिक शाळा कारखान्यांनी स्वत:च चालवाव्यात. तेव्हा कारखान्यांनी अशा शाळा चालविण्याची जबाबदारी स्वीकारावी हे सांगताना भाऊराव किती अचूक व दूरदृष्टीने विचार करीत होते हे दिसून येते.
३२) कर्मवीर भाऊराव ९ मे १९५९ रोजी निधन पावले. त्या साली माध्यमिक शाळा ८५ होत्या. त्यांच्या मृत्युनंतर एका वर्षात म्हणजे १९५९-६० साली ही संख्या 9११ झाली आणि भाऊरावांनी १९४८ साली जाहीर केल्याप्रमाणे १०१ माध्यमिक शाळा सुरू करण्याचे त्यांचे अभिवचन त्यांच्या पश्वात त्यांच्या शिष्यांनी व सहकाऱ्यांनी पुरे केळे.
३३) सन १९४८ साली महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ सुरू करण्याचे जाहीर केल्यापासून, माध्यमिक शाळांच्याबरोबर महाविद्यालय सुरू करण्याकडे त्यांचे लक्ष लागले होते. सन १९५ ३ पासून सातारच्या शिवाजी महाविद्यालयात पदवीपरीक्षेचे वर्ग सुरू झाल्यापासून विद्यार्थीसंख्या वाढत राहिली व ते महाविद्यालय आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर झाले.
Hits: 80