८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - १
प्रकरण आठवे
८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - १
9) सहाव्या प्रकरणात रयत शिक्षण संस्था काले गावी स्थापन केली असल्याचे सांगितले आहेच. परंतु रयत शिक्षण संस्थेची घटना व तिची सन
१८६० च्या संस्थानोंदणी कायद्याखाली नोंद असल्याशिवाय तिला शासनमान्य शैक्षणिक संस्था सुरू करता येत नसे. संस्थेच्या इतिहासात १९३५ हे साल अतिशय महत्त्वाचे आहे. कारण याच साली
१ ) संस्थेची घटना तयार होऊन संस्था रजिस्टर झाली.
२) भाऊरावांचे प्राथमिक शिक्षकासाठी काढावयाच्या ट्रेनिंग कॉलेजचे स्वप्न साकारले व जनसामान्यात शिक्षण प्रसाराच्या चळवळीचा पाया घातला गेला.
भारताच्या दृष्टीने १९३५ चा कायदा लागू करण्यात आला. ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने पंचम जॉर्ज बादशहाच्या राज्यारोहणाची रजत जयंती साजरी होत होती. यावेळी सातारा जिल्हाधिकारी होते श्री. हमीद ए. अली, न्यायमूर्ती अब्बास तय्यबजीचे जावई. सातारा जिल्हा ग्रामीण विकास समितीचे ते अध्यक्ष होते. भाऊराव सभासद होते. भाऊरावांना हे जिल्हाधिकारी ग्रामीण विकास प्रचारसभांना स्वत:बरोबर नेत. भाऊरावांच्या एका व्याख्यानाने जिल्हाधिकार्याचे निम्मे काम होऊन जात असे. हमीद ए. अली भाऊरावाप्रमाणेच म. गांधींचे चाहते होते. त्या दोघांत गाढ मैत्री निर्माण झाली. प्राथमिक शिक्षकांसाठी ट्रेनिंग कोलेज स्थापन करावयाच्या भाऊरावांच्या प्रयत्नास बादशहाच्या राज्यारोहणाच्या रजत जयंतीची वेळ योग्य असल्याचे श्री. हमीद अलींना वाटले. त्यांनी तसे भाऊरावांना सुचविले. तात्काळ भाऊरावांनी आपले स्नेही व आश्रयदाते श्री. रावबहादूर काळ्यांना हा विचार सांगितला. श्री. काळेंनी वेळ न गमावता संस्थेची पहिली घटना तयार करून मुंबईस संस्थानोंदणी कार्यालयाकडे पाठविली. क्रमांक ७६३/ १९३५ ने ता. २५-४-१९३५ ला रयत शिक्षण संस्था कंपनी निबंधकाने नोंदविली. पुढील संस्थापक सदस्य होते. रा. ब. रावजी रामचंद्र काळे १६-६-१९३५ अखेरपावेतो पहिले अध्यक्ष होते. काणया दिवशी नवीन घटनेप्रमाणे अठरा सदस्यांचे कार्यकारी मंडळ प्रथम अस्तित्वात आले, ते असे :
(३) संस्थापक सद्स्य -
१) श्री. रा. ब. रावजी रामचंद्र काळे, बी. ए. एलएल. बी. अँडव्होकेट
२) श्री. भाऊराव पायगौंडा पाटील, व्यवस्थापक श्री छत्रपती शाहू बोर्डिग हाऊस, सातारा
३) श्री. के. एस. दीक्षित, बी. ए. (निवृत्त) उपशिक्षणाधिकारी
४) श्री. ए. पी. मोहिते, बी. ए. एलएल. बी. .
५) श्री. आर. बी. शिंदे, बी. ए. एठएल. बी., एम. एल. सी.
६) श्री. बी. एन. नलावडे, बी. ए. एलएल. बी. .
७) श्री. बी. एस. बारटक्के, बी. ए. एलएल. बी. (निवृत्त) पोलीस व १ महसूल अधिकारी, बडोदा व कोल्हापूर
८) रावसाहेब मो. बा. मुथा, ऑन. मॅजिस्ट्रेट, सातारा
९) श्री. आर. पी. पाटील, बी. ए., बी. एस्सी, एलएल. बी.
१०) श्री. सरदार आर. आर. पंडितराव, डी. एल. बी. सभासद, सातारा
११) श्री. सरदार वाय. एस. राजे भोसले, तालुका लोकल बोर्ड सभासद, सातारा
१२) श्री. बाजीराव जे. देशमुख, डी. एल. बी. सभासद, सातारा
१२) श्री. भाऊसाहेब दादा कुदळे, डी. एल. बी. सभासद, सातारा
१४) श्री. सी. के. माने अध्यक्ष, रहिमतपूर, नगरपालिका, जि. सातारा
१५) श्री. ज्ञानदेव घुवनाथ घोलप, माजी एम. एल. सी.
१६) श्री. इस्माईल मोहोंमदसाहेब मुल्ला, बी. ए.
१७) श्री. एन. आर. माने, बी. ए.
१८) औ. एल. बी. भिंगारदेवे, बी. ए.
शेवटचे तिघे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसचे माजी विद्यार्थी होते.