निवेदन

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

“महाराष्ट्राचे शिल्पकार” या योजनेतील हे एक पुस्तक.

माणसाला जगायला अन्नाप्रमाणे शिक्षण देखील आवश्यक ठरते. स्वत:ची सर्वप्रकोरे प्रगती करून जीवन आनंदमय करायचे तर ज्ञान व परिस्थितीचे भान असायलाच हवे. ते शिक्षणाविना लाभणे कठीणच. अशा ह्या मौलिक शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्य जनतेत होणे आवश्यक. हे जाणून ह्या महाराष्ट्रात प्रथम जोतीराव फुले ह्यांनी हे शिक्षण प्रसाराचे व्रत स्वीकारले. त्यांचा वसा पुढे महाराष्ट्रात अनेकांनी घेतला व चालवला. त्यांच्यापैकी कर्मवीर भाऊराव पाटील हे एक अग्रगण्य
शिक्षणतज्ज्ञ. त्यांनी “रयत शिक्षण संस्था” स्थापन करून शिक्षण प्रसाराचे सर्वदूर जाळे विणिले.

त्यांच्या काळची परिस्थिती व त्या पार्श्वभूमीवरील त्यांचे कर्तृत्व समाजाला कळावे व कर्मवीर भाऊराव पाटलांचे चरित्र आणि चारित्र्य आदर्श म्हणून लोकांना अवलोकिता यावे या उद्देशाने हे लिहून घेतलेले आहे.


___ लेखक डॉ. रा. अ. कडियाळ, ह्यांचे मंडळ आभारी आहे. ह्या पुस्तकाचे मुद्रक व मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत वडे ह्यांनी हे पुस्तक लवकर व उत्तम प्रकारे निघावे म्हणून बरेच श्रम घेतले आहेत. मंडळ
त्यांचेही आभारी आहे.

रसिक ह्याचे स्वागत करतील ही मनीषा.
डॉ. मधुकर आष्टीकर
अध्यक्ष, “
दिनांक १३ फेब्रुवारी, १९९८ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

Hits: 106
X

Right Click

No right click