गीतारहस्य - प्रस्तावना - लोकमान्य टिळक - १ .

Parent Category: मराठी पुस्तके Category: गीतारहस्य Written by सौ. शुभांगी रानडे

संतांची उच्छिष्टें बोलतों उत्तरे ।
काय म्यां पामरें जाणावें हे ।।
--- तुकाराम.

श्रीमद्भगवत्गीतेवर अनेक संस्कृत भाष्ये, टीका किंवा प्राकृत भाषांतरे Dगर विस्तृत सर्वमान्य निरूपणे असतां, हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचें कारण काय हे जरी ग्रंथारंभींच सांगितले आहे, तरी ग्रंथामधील प्रतिपाद्य विषयाच्या विवेचनांत सांगतां न येणाऱ्या कांही गोष्टींचा खुलासा करण्यास प्रस्तावनेखेरीज दुसरा मार्ग नाही. पैकीं पहिली गोष्ट स्वतः ग्रेथकारासंबंधी होय. भगवद्रीतेचा व आमचा प्रथम परिचय होऊन आज सुमारे त्रेचाळीस वर्षे झाली. इसवी सन १८७२ साली वडील शेवटच्या दुखण्यानें आजारी असतां भगवद्गीतेवरील भाषाविवृति नांवाची प्राकृत टीका त्यांस वाचून दाखविण्याचे काम आमचेकडे आले होतें. तेव्हां म्हणजे आमच्या वयाच्या सोळाव्य़ा वर्षी गीतेचा भावार्थ पूर्णपणे लक्षांत येणे शक्‍य नव्हते. तथापि लहान बयांत मनावर घडणारे संस्कार टिकाऊ असल्यामुळे भगवद्रीतेबद्दल तेव्हा उत्पन्न झालेली आवड कायम राहून संस्कृताचा व इंग्रजीचा पुढं अधिक अभ्यास झाल्यावर गीतेवरील संस्कृत भाष्ये व दुसऱ्या टीका आणि इंग्रजींत व मराठींत अनेक पंडितांनी केलेली विवेचनेंही वेळोवेळी वाचण्यांत आली.

परंतु स्वकीयांवरोबर युद्ध करणे हें मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेत ब्रह्मज्ञानाने किंबा भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचें, म्हणजे नुसत्या मोक्षमार्गाचे, विवेचन कशाला, ही हांका मनांत येऊन तीच उत्तरोत्तर बळावत चालली. कारण, गीतेवरील कोणत्याहि टीकेंत त्याचे योग्य उत्तर आढळून येईना. आमच्याप्रमाणे दुसऱ्यांना हीच शंका आली असेल, नाही असे नाही. पण टीकांतच गुंतून राहिलें म्हणजे, टीकाकारांनी दिलेले उत्तर समाथानकारक न वाटले तरी त्याखेरीज दुसर उत्तर सुचत नाहीसे होते. म्हणून सर्व टीका व भाष्ये बाजूला ठेवून नुसत्या गीतेचीच स्वतंत्र विचारपूर्वक आम्हीं अनेक पारायणे केली. तेव्हां टीकाकारांच्या छापेतून सुटका होऊन मूळ गीता निवृत्तिपर नसून कर्मयोगपर आहे, किंबहुना गीतेत "योग" हा एकेरी शब्दच "कर्मयोग" या अर्थी योजिलेला आहे; असा बोध झाला; ब महाभारत, वेदान्तसूत्रे, उपनिषदे आणि वेदान्तशास्त्रावरील इतर संस्कृत ब इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनानेंहि तेंच मत दृढ होत जाऊन, तें लोकांत प्रसिद्ध केल्यानें या विषयाचा अधिक ऊहापोह होईल व खरें काय याचा निर्णय करण्याला सोयीचे पडेल, अशा बुद्धीनें या विषयावर चारपांच ठिकाणीं निरनिराळ्या वेळीं जाहीर व्याख्याने दिली. यांपैकी एक व्याख्यान नागपुरास सन १९०२ सालच्या जानेवारीत व दुसरें जगद्गुरु श्रीशंकराचार्य मठ करवीर व संकेश्वर यांच्यासमोर त्यांच्याच आज्ञेवरून संकेश्वरमठात सन १९०४ सालच्या आगस्ट महिन्यांत झालेले असून, नागपूर येथें दिलेल्या व्याख्यानाचा गोषवाराहि तेव्हां वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेला आहे.
याशिवाय याच हेतूनें सवडीप्रमाणे कांही विद्वान मित्रांबरोबर खासगी रीतीने वेळोवेळा वादविवादाहि केला. या मित्रांपैकींच कै० श्रीपतिबुवा भिंगारकर हे एक होते. यांच्या सहवासाने भागवत संप्रदायांतील कांही प्राकृत ग्रंथ पहाण्यांत येऊन, गीतारह्स्यांत वर्णिलेल्या कांही थोड्या गोष्टी बुवांच्या व आमच्या वादविवादांतच प्रथम निश्चित झालेल्या आहेत. बुवा हा ग्रंथ पहाण्यास राहिले नाहीत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. असो; अशा तऱ्हेने गीतेतील प्रतिपाद्य विषय प्रवृत्तिपर आहे हें मत कायम होऊन, व ते लिहून काढण्याचे ठरूनहि, बरीच वर्षे झाली. पण हल्ली उपलब्ध होणारी भाष्ये, टीका किंवा भाषान्तरें यांत न स्वीकारिलेले हें गीतातात्पर्य, नुसते म्हणजे पूर्वीच्या टीकाकारांनी ठरविलेलें तात्पर्य आम्हांस कां ग्राह्य नाही यांची कारणें न दाखवितां, पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्यास पुष्कळ गैरसमज होण्याचा संभव होता; आणि सर्व टीकाकारांच्या मतांचा संग्रह करून त्यांतील अपुरेपणा सकारण दाखविण्याचे, आणि गीताधर्माची इतर धर्माशी किंबा तत्त्वज्ञानांशी तुलना करण्याचें, काम बऱ्याच प्रयासाचें असल्यामुळे, तेहि थोडक्या कालांत नीट उरकण्यासारखे नव्हतं. म्हणून आम्ही गीतेवर एक नवीन ग्रंथ लवकरच प्रसिद्ध करणार आहों, असे आमचे मित्र रा. रा. दाजीसाहेब खरे व दादासाहेब खापर्डे यांना थोड्या घाईने आागाऊच जरी जाहीर केले होते, तरी आपली सामग्री अद्याप पुरी नाहीं असे वाटून ग्रंथ लिहिण्याचे काम दिरंगाईवर पडत चालले; आणि पुढे सन १९०८ सालीं शिक्षा होऊन ब्रह्मदेशांत मन्डाले शहरी जेव्हां आमची रवानगी करण्यांत आली, तेव्हा तर हा ग्रंथ लिहिण्याचा संभव बहुतेक खुंटल्यासारलाच झाला होता.

परंतु ग्रंथ लिहिण्यास अवश्य लागणारी पुस्तकादि साधने पुण्याहून तेंथे नेण्याची परवानगी कांही काळाने सरकारच्या मेहेरबानीने मिळाल्यानंतर सन १९१०-११च्या हिंवाळ्यांत (शके १८३२, कार्तिक शुद्ध १ ते फाल्गुन वद्य ३० च्या दरम्यान) या ग्रंथाचा खर्डा मन्डालेच्या तुरुंगांत प्रथम लिहून काढिला; आगि पुढे वेळोवेळी सुचत गेल्याप्रमाणे त्यांत सुधारणा केली, व तेव्हा सर्वे पुस्तके जवळ नसल्यामुळें कित्येक स्थळीं जो अपुरेपणा राहिला होता तो तेथून सुटका झाल्यावर पुरा करून घेतला. तथापि अद्यापहि हा ग्रंथ सर्वांशी पूर्ण झाला असें म्हणतां येणार नाही. कारण मोक्ष व नीतिथर्म याची तत्त्वे गहन असून त्यांसंबंधानें अनेक प्राचीन व अर्वाचीन पंडितांनी इतकें विस्तृत विवेचन केले आहे की, फाजील संचार जाऊं न देतां त्यांतील कोणत्या गोष्टी या लहानशा ग्रंथांत घ्याव्या याचा योग्य निर्णय करणें पुष्कळदा कठिण पडतें. पण महाराष्ट्र-कविवर्य मोरोपंत यांनीं वर्णिल्याप्रमार्णे--

कृतान्तकटकामल ध्वज-जरा दिसो लागली ।
पुर:सर-गदांसवे झगडतां तनू भागली ॥

अशी आमचीहि सध्यां स्थिति झाली असून संसारांतील सहचारीहि पुढें निघून गेले, यासाठी आपल्याला उपलब्ध झालेली माहिती, व सुचत आलेले विचार आपण लोकांस कळवावे, कोणी तरी 'समानधर्मा' सध्यां अगर पुढें निघून ते पुरे करील, अशा समजुतीने हा ग्रंथ आतां प्रसिद्ध केला आहे.

Hits: 136
X

Right Click

No right click