दीनानाथ मंगेशकर
एक प्रसिध्द गायक, नट, गोव्यात श्री मंगेश देवस्थानचे उपाध्ये- पुजारी, गणेशपंत नवाथे (अभिषेकी) यांचे सुपुत्र. दीनानाथांना बालपणापासून गायनाची आवड, किर्लोस्कर नाटक मंडळीत ताजेवफा, काँटो में फूल अशी उर्दु-हिंदी नाटके बालनट दीनानाथ यांच्या गायनावर किर्लोस्कर मंडळीने चिंतामणराव कोल्हटकरांच्या पुढाकाराने कलकत्यापर्यंत प्रवास झाला. मोहक सतेज मृदा, गौर अंगकांती, भव्य भालप्रदेश रेखीव नेत्र, सुडौल बांधा, कुरळे केस, शांत, धाडसी, लोकसंग्रहाची आवड असणारा स्वभाव ही दीनानाथांची वैशिष्ट्ये !