दया पवार
दया पवार हे आजच्या काळातील एक आघाडीचे दलित साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव दगडू मारुती पवार असे आहे. पण दया पवार या नावाने ते सर्वाना परिचित आहेत. दया पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्यातील धामणगाव या ठिकाणी इ.स.१९३५ मध्ये झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत ते जन्माला आले असल्याने अगदी बालपणापासूनच त्यांनी अस्पृश्यतेचे चटके सोसले होते. दया पवार हे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत; तथापि ‘बलुतं ’हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक साहित्यविश्वात विशेष गाजले.‘बलुतं’ने दलित साहित्यात आत्मकथनपर निवेदनात्मक पुस्तकांचा एक नवा प्रवाहाच निर्माण केला. आपल्या कोंडवाडा या कवितेत ते म्हणतात-
"आज विशाद वाटतो कशा वागविल्या मणामणाच्या बेडया
गाळात हत्तीचा कळप रुतावा तशा ध्येय-आकांक्षा रुतलेल्या
शिळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद कुणी निर्मिला हा कोंडवाडा?"
ग्रंथसंपदा : कोंडवाडा हा कवितासंग्रह याशिवाय चावडी हा लेखसंग्रह व इतर स्फ़ुटलेखन.
Hits: 442