बालकविता-३
| बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ...... श्री. कृ. कोल्हटकर. |
| मोत्या शीक रे अ आ ई ! सांगुं कितीतरि बाई ! .... दत्त. |
| या बाळांनो, या रे या लवकर भरभर सारे या । ..... भा. रा. तांबे. |
| ये ये ताई पहा पहा गंमत नामी किती अहा ! ......हरी सखाराम गोखले. |
| लइ मानस अमुचा, द्यावी आपल्या घरीं ही पोर पर शंका येउन कांहीं घेते हें मन माघार ! ......यशवंत. |
| लहान माझी बाहुली मोठी तिची सांवली ...... |
| लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार गुलगुलीत हे अंग मजेचें शेपुट गोंडेदार. ......म. का. कारखानीस. |
| वन सर्व सुगंधित झालें, मन माझें मोहुन गेलें - किति तरी !......नारायण वामन टिळक |
| वाढुं दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाहीं क्षिती......यशवंत. |
| वाहवा ! वाहवा ! चेंडू हा । तर तो आपण घेउनियां ।......मिस मेरी भोर. |
| वेडिंवाकडी घेउन वळणें नागिण धांवे जणुं रोषानें......वा. गो. मायदेव. |
| शिवी कोणा देऊ नये ।। कोणासंगे भांडू नये ।।...... |
| श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोहिंकडे; क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे. ......बालकवि ठोंबरे. |
