बालकविता -१
| अनुदिनि अनुतापें तापलो रामराया । परम दिन-दयाळा नीरसी मोह-माया ।। ....... रामदास. |
| आजीच्या जवळी घड्याळ कसलें आहे चमत्कारिक, देई ठेवुनी तें कुठें अजुनि हें नाही कुणा ठाउक ; .......केशवकुमार. |
| आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ।। सत्यास ठाव देई, ......आनंदराव कृष्णाजी टेकाडे. |
| आनंदी आनंद गडे ! इकडे तिकडे चोहिंकडे....बालकवि ठोंबरे. |
| आमुचें घर छान शेजारी वाहे ओढा ......माधव ज्युलियन. |
| आस ही तुझी फार लागली ।। दे दयानिधे बुध्दि चांगली ।। उंच पाटी पालथी उशाखालीं हात दोन्हीही आडवे कपाळी;.......केशवकुमार. |
| उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडलें .......कुसुमाग्रज |
| एका कोळियाने एकदां आपूलें । जाळें बांधियेलें उंच जागीं ।। ...... करी आरती घेउनी आर्यबाला |
| कशासाठी पोटासाठी- खंडाळयाच्या घाटासाठीं ....... माधव ज्युलियन. |
| कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जगासी एकला तो ।। फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं । जीवन तयासी कोण घाली ।। .......तुकाराम |
| कावळा म्हणे मी काळा । पांढरा शुभ्र तो बगळा । ....... रा. देव |
| कुणा आवडतो मोर पिसार्याचा असे कोणाला छंद कोकिळेचा; .....दत्तप्रसन्न कारखानीस. |
| गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी कडक उन्हानें जीव घाबरे, कपोल सुकले घमें भिजले पायीं चटके तापे डोकें, धांपा टाकीत पळे जरी ......श्रीधर बाळकृष्ण रानडे. |
