रक्षाबंधन - ३

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

इकडे महमंद कसा तरी १० वी पर्यंत पोहाचला. पण एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊं शकला नाही. मुंबई येथील अंधेरीला नोकरीस असलेल्या मामाने त्याला बोलावून घेतले आणि मोटार दुरूस्तीच्या कारखान्यात कामाला लावले, त्या कारखान्यात बांगला देशहून आलेली पांच सहा व पाकिस्तान मधून आलेली तीन चार मुले होती. अधून मधून एक पाकिस्तानी नागरिक उत्तम ड्रेस घालून येई. तो त्याना जेवायला बरोबर घेऊन जाई. त्याना भेटवस्तू देई. तो स्वत: भरपूर श्रीमंत असल्याचे मुलाना भासवी. त्याची भाषा अत्यंत गोड असल्याने त्याने सर्व मुलांना आपलेसे करून घेतले. पुढे पुढे प्रत्येक दोन महिन्यानी येऊन तो प्रत्येकाला हजार दोन हजार रूपये भेट म्हणून देऊ लागला. त्याने त्या मुलांना इतके अंकित करून ठेवले की तो म्हणेल ते करण्याची मुलांची तयारी असे. कारखानदाराच्या सहाय्याने त्याने या सर्व मुलांच्या रहाण्याची सोय शेजारच्याच इमारतीत केली. या मुलांचा जनतेशी फारसा संपर्क येऊ नये असे प्रयत्न सुरू झाले. दीड दोन वर्षानंतर या मुलांचा उपयोग करून घेण्याची त्याने एक योजना आखली. जानेवारी पासूनच त्याने मुलाना ट्न्ेिंनग द्यायला सुरवात केली. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या लोकल मधून त्याने मुलाना हिंडवून आणले. सर्व स्टेशन्सची माहिती दिली. कोणत्या लोकलने कोठे जायचे, कोठे उतरायचे, सांगितलेले काम करून कोठे उभे रहायचे याचे सर्व ट्रेनिंग जून मध्येच पुरे झाले. त्यावर्षी १४ ऑगस्ट ला रविवारी रक्षाबंधन व १५ ऑगस्टला, सोमवारी स्वातंत्र्यदिवस होता. १५ ऑगस्टला मध्य व पश्चिम रेल्वे वरील तीन तीन प्रमुख स्टेशन्स व २४ बोगीमध्ये एकाच वेळी स्फोट व्हावेत, यासाठी त्याने या मुलांच्या आणि इतर दोन ठिकाणाहून त्याला मिळणार्‍याअशा एकूण तीस मुलांच्या मदतीने एक योजना आखली. बाँबस्फोट झाल्यानंतर प्रत्येकाला भरपूर रक्कम मिळणार होती. शिवाय तो सर्वांना १५ दिवस काश्मीरला घेऊन जाणार होता. स्फोट करण्यासाठी जेवणाचा डबा घेऊन लोकल मध्ये कोठे चढायचे, डबा कोठे ठेवायचा, डबा बोगीतच ठेऊन कोणत्या स्टेशनवर उतरायचे, २५-३० फूट अंतरावर कोठे उभे रहायचे, खिशात ठेवलेल्या रिमोटचे बटण केंव्हा दाबायचे, गर्दीतून बाहेर पडून कोठे जायचे, याचे ट्रेनिंग पुरे झाले.
एका इमारतीच्या तळघरात त्याने जागा भाड्याने घेतली. ३५-४० गाद्या, रंगीत टी.व्ही. वगैरे या सर्व मुलांची रहाण्याची व्यवस्था केली. शनिवार दि. १३ ला त्याने या ३० मुलांना प्रत्येकी ५००० रू. दिले. महंमदने १००० रू. ठेवून ४००० रू. मनीऑर्डरने घरी पाठवायचे ठरवले. तो अंधेरीच्या पोस्टात गेला. मनीऑर्डरचा फॉर्म भरला. फॉर्म आणि पैसे क्लार्ककडे दिले. त्याचे अंात लक्ष गेले आणि नुकतेच त्या पोष्टात बदलून आलेले देशपांडे पोष्टमास्तर त्याला दिसले. त्यांचेही सहज तिकडे लक्ष गेले आणि त्यांनी त्याला आत बोलावले. त्याची चौकशी केली. मनोहर आणि मधुरा दुसर्‍या दिवशी (रविवारी) रक्षाबंधनासाठी आणि भोजनासाठी घरी येणार आहेत आणि त्यानेही भोजनाला यावे, असे त्यांनी सांगितले. त्यांची भेट होणार म्हणून त्याला आनंद झाला. शनिवारी संध्याकाळी सात वाजता त्या पाकिस्तानी गृहस्थाने सर्वाना आराम बसने निर्मनुष्य ठिकाणी नेले. एक डबा एके ठिकाणी ठेवला. २५-३० फूट अंतरावर उभे राहून रिमोटचे बटण कसे दाबायचे हे त्याने दाखवले. महंमदला बटण दाबायला सांगितले आणि प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे या मुलांना काहीही इजा होत नाही याची खात्री झाली. त्यानंतर त्याने त्याना हॉल मध्ये आणून जेवण दिले. १५ ऑगस्ट रोजी बाँब असलेला डबा घेऊन कोणत्या स्टेशनवर कोणत्या लोकल मध्ये चढायचे. सकाळी ८ च्या सुमारास कोणत्या स्टेशनवर डबा न घेता उतराययचे आणि २५-३० फूट लंाब जाऊन रिमोटचे बटन दाबायचे याची जाणीव प्रत्येकाला बोलावून स्वतंत्रपणे दिली.

Hits: 591
X

Right Click

No right click