सुविचार-१

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
जो स्वत: दानधर्म करतो आणि दुसऱ्यांनीही करावा असे इच्छितो तो सात्विक.
जो लवकर रागावत नाही पण शांत होतो, तो सात्विक.
जो कोणी, तुझे ते तुझे आणि माझे तेही तुझे असे म्हणतो तो सात्विक.
जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.
सुखदु:खाच्या लंपडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे.
व्देषाला सहनुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.
माणूस शक्तिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर शक्तिमान नसला तर ते त्याचे शत्रू होतात.
सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती होय.
कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते. फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात.
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.
मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दंवबिन्दू होऊन एखाद्या तहानलेल्याची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होय.
स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
खऱ्याला केव्हाही मरण नाही नि खोट्याला शंती नाही.
बुध्दीने कळते पण कृतीशिवाय वळत नाही.
चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.
लोक जितके हुशार आणि कारागीर, तितक्या कृत्रिम गोष्टी जास्त.
सुवचन श्रवणाने शहाणपण तर दुर्वचन बोलण्याने पश्चाताप करण्याची पण पाळी येते.
तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.
शुध्द भक्ती हे सोंग नसून मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे.
नियम अगदी थोडा असावा, पण तो प्राणपलीकडे जपावा.
हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा.
जो लवकर रागावतो व लवकर शांत होतो, त्यास हानी कमी व लाभ अधिक.
जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तो ज्ञान वाढवतो.
अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम.
बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.
माणसे जन्माला येता पण माणुसकी निर्माण करावी लागते.
मोहपाशमुक्त झाल्यानेच मनुष्याला देवत्व प्राप्त होते.
वासना मोकाट सुटली तर ती स्वत:च स्वत:ची राखरांगोळी करून टाकणारी ज्वाला बनते.
Hits: 894
X

Right Click

No right click