प्रसारमाध्यमे आणि मालकीहक्क

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

सध्या फेसबुक, व्हॉट्सएपवरील माहितीच्या गोपनीयतेविषयी मोठे वादळ उठले आहे. लोक एका माध्यामातून दुसरीकडे जात आहेत. मात्र कायदेशीर बाब विचारात घेतली तर या सुविधा खासगी मालकीच्या असल्याने कोर्ट त्याबाबतीत काही करू शकत नाही असे मत परवा दिल्ली हायकोर्टाने व्यक्त केले असून ग्राहकांना नको असेल तर सुविधा न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्र वा लेखनाची मालकी तरी लेखकाकडे असली तरी ते साहित्य वर्तमानपत्र, मासिक, पुस्तक वा इंटरनेटवर ब्लॉग वा वेबसाईटच्या माध्यमातून प्रकाशित झाले तर त्यावर लेखक व प्रकाशकाची संयुक्त मालकी असते. मात्र बहुतेक वेळा प्रकाशक लेखकाला काही मानधन देऊन सर्व मालकी आपल्याकडे ठेवतो. अशावेळी मूळ लेखकाला त्या साहित्याचे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करता येत नाही. लेखकाने याबाबतीत जागरूक राहून आपल्या स्वामित्व हक्कांबाबत योग्य तो करार करणे अत्यंत आवश्यक असते. बहुतेक लेखकांना हे माहीत नसते. वेबसाईटच्याबाबतीत लेखकाला पुस्तकरुपात लेख प्रसिद्ध करता येत असले तरी त्याच्या वेबसाईटवरील मजकुराची मालकी वेबसाईटकडेच राहते.

माझ्या माहितीच्या अनेक लेखकांना काही मोफत प्रती आणि मानधन यावर आपले सर्व हक्क सोडावे लागल्याचे माहीत आहे. त्यामुळे वृत्तपत्रात किंवा वेबसाईटवर आपले साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी आपण आपला मालकीहक्क घालवत आहोत याची जाणिव ठेवली पाहिजे.

- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Hits: 220
X

Right Click

No right click