जुमला वेबसाईटचे डिझाईन - ३
जुमला वेबप्रणालीच्या दर्शनी भागामध्ये ( Front End) खालील फाईल व फोल्डर असतात.
मागच्या लेखात आपण फाईलविषयी माहिती घेतली. आता फोलडरविषयी माहिती घेऊ.
टेम्पररी (tmp) -
जुमला प्रणालीमध्ये नवीन विभाग व सुविधा जोडताना झिप फाईल उघडाची लागते अशाचेळी तात्पुरत्या साठ्यासाठी हे फोल्डर वापरले जाते.
मांडणीप्रकार (templates)-
वेबपेजमधील मजकूर, चित्रे व विभाग कशाप्रकारे मांडायचे याचे आकृतीबंध या फोल्डरममध्ये ठेवलेले असतात.
कॅशे फोल्डर (cache) -
प्रत्येक वेबपेज तयार करताना डाटाबेसमधील माहिती, टेमप्लेटनुसार माँडणी, चित्रे इत्यादि अनेक गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. जर युजरने तेच वेबपेज पुन्हा उघडले किंवा दुस-या कोणी जर तीच माहिती मागवली तर पुन्हा तीच सर्व कृती करावी लागू नये म्हणून काही काळापर्यंत ( सुमारे १५ मिनिटे) वेबपेजची सर्व माहिती या तरल स्मृतीकक्षात साठवली जाते. त्यामुळे पुन्हा वेबपेज दाखविणयास वेळ कमी लागतो. ठराविक काळाने ती माहिती नाश पावते वा त्याजागी नवी माहिती येते. यामुळेच केलेला बदल कॅशे फोल्डर रिकाम केल्याखेरीज आपल्याला लगेच दिसत नाही.
मुख्य विभाग (components)
वेबपेजमधील सर्वात मुख्य माहितीविभागासाठी यातील पर्याय निवडला जातो. बॅनर (जाहिरात), शोधपट्टी, संदर्भ यासारखे अपवाद वगळले तर लेख (), संपर्क, बातम्या, फोटोगॅलरी यासारखे इतर सर्व कॉंपोनंट वेबपेजचा सर्वात मोठा भाग व्यापतात.
छोटे भाग (modules)
मुख्य माहितीची जागा सोडली तर इतर जागेत म्हणजे डाव्या, उजव्या, खालच्या वा वरच्या रकान्यांमध्ये मोड्यूल या छोट्या विभागांचे आकृतीबंध या फोल्डरमध्ये असतात. मेनू( विषयसूची), लॉगिन बॉक्स, नवी माहिती, स्टॅटिस्टिक्स यासारखे मोड्यूल या फोल्डरमध्ये असतात.
जोड (plugins),
कॉंपोनंट आणि मोड्यूल यांच्या कारयपद्धतीत काही बदला करण्यासाठी हे जोड प्रोग्रॅम वापरले जातात.
मिडिया (media)
या फोल्डरमध्ये कॉंपोनंट आणि मोड्यूलसाठी लागणा-या जावास्क्रिप्ट, सीएसएसच्या फाईल ठेवलेल्या असतात.
संदर्भ (libraries)
येथे जुमला प्रणालीचे सर्व प्रोग्रॅम व फंक्शनल क्लासेस असतात.
लेआऊट्स (layouts),
वेबसाईटमधील सर्व विभागांच्या मांडणीचे पर्याय यात असतात.
भाषा (language)
वेबसाईटवर वेगवेगळ्या भाषांमध्ये शीर्षके, मेनू वा सूचना दाखवायच्या असतील तर प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र फोल्डर यात असतात.
समावेशक (includes)
वेबपेज कार्यान्वित होण्यासाठी लागणारे नियम, कॉम्स्टंट्स यांची माहिती व फाईल यात असतात. त्यामुळे यांचा समावेश प्रोग्रॅमच्या सुरुवातीस केला जातो.
चित्रे (Images)
वेबसाईटवर दाखवायची सर्व चित्रे, आकृत्या व फोटो यासाठी हे फोल्डर वापरले जाते. प्रत्येक कॉंपोनंट आणि मोड्यूलसाठी यात वेगवेगळे फोल्डर असतात.
CLI (Command Line Interface) कमांड प्रॉंम्टचा वापरकरून जुमला कारयान्वित करता यावे यासाठी या फोल्डरचा समावेश जुमलाच्या नव्या आवृत्तीत केला आहे.
इतर (Bin) -
या फोल्डरमध्ये पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी कीचेन प्रोग्रॅम ठेवलेला असतो.
Hits: 144