शब्दसमूहाबद्दल एक शब्द

Parent Category: ROOT Category: मराठी भाषा Written by सौ. शुभांगी रानडे
पाहिल्याबरोबर लगेच प्रथमदर्शनी कोणतीही तक्रार न करता विनातक्रार
जन्मापासून मरेपर्यन्त आजन्म कधीही मृत्यू न येणारा अमर
उपकार जाणणारा कृतज्ञ संख्या मोजता न येणारा असंख्य
मिळूनमिसळून वागणारा मनमिळाऊ विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा वसतिगृह
गुप्त बातम्या कढणारा गुप्तहेर लहानापासून थोरांपर्यन्त आबालवृद्ध
सतत द्वेष करणारा दीर्घद्वेषी आईवडील नसणारा अनाथ
देवावर विश्वास ठेवणारा आस्तिक चार रस्त्यांचा समूह चौक
झोपेच्या आधीन निद्राधीन उपकार न जाणारा कृतघ्न
महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक
मनास आकर्षून घेणारे मनमोहक गुरे बांधण्याची जागा गोठा
घोडे बांधण्याची जागा पागा दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक
पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक अजिबात शत्रू नसणारा अजातशत्रू
वर्षातून प्रसिद्ध होणारे वार्षिक पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले द्वीप
काहीही माहेत नसलेला अनभिज्ञ कलेची आवड असणारा कलावंत
विक्री करणारा विक्रेता जे होणे अशक्य आहे असंभव
रोज घडणारी हकीकत दैनंदिनी सर्व काही जाणणारा सर्वज्ञ
दगडासारखे हृदय असणारा पाषाणहृदयी चहाड्या करणारा चहाडखोर
जे माहीत नाही ते अज्ञात कहीही न शिकलेले अशिक्षित
दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी कायमचे लक्षात राहणारे अविस्मरणीय
दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक सभेत धीटपणे बोलणारा सभाधीट
कानाला गोड वाटणारे कर्णमधुर लोकांचे नेतृत्व करणारा नेता
सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही दगडावर कोरलेला लेख शिलालेख
कधीही न जिंकला जाणारा अजिंक्य लोकांची वस्ती नसलेला भाग निर्जन
पसंत नसलेला नापसंत देवळाच्या आतील भाग गाभारा
श्रम करून जगणारा श्रमजीवी

Hits: 8674
X

Right Click

No right click