मनाचे श्लोक १९१-२००

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ॥

परब्रह्म ते मीपणे आकळेना ।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥१९१॥
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ।
दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे ॥

तया खूण ते हीन दृष्टांत पाहे ।
तेथे संग नि:संग दोनी न साहे ॥१९२॥
नव्हे जाणता नेणता देवराणा ।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ॥

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥
वसे हृदयी देव तो कोण कैसा ।
पुसे आदरे साधकू् प्रश्न ऐसा ॥

देहे टाकिता देव कोठे रहातो ।
परी मागुता ठाव कोठे पहातो ॥१९४॥
वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ॥

सदा संचला येत ना जात कांही ।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥१९५॥
नभी वावरे जो अणूरेणू कांही ।
रिता ठाव या राघवेवीण नाही ॥

तया पाहता पाहता तेचि जाले ।
तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले ॥१९६॥
नभासारिखे रूप या राघवाचे ।
मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे ॥

तया पाहता देहबुद्धी उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥१९७॥
नभे व्यापिले सर्व सृष्टी आहे ।
रघूनायका ऊपमा ते न साहे ॥

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥१९८॥
अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ।
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे ॥

अती गूढ ते दृढ तत्काळ सोपे ।
दुजेवीण जें खूण स्वामीप्रतापे ॥१९९॥
कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ॥

मना उन्मनी शब्द कुंठीत राहे ।
तो गे तोचि तो राम सर्वत्

Hits: 610
X

Right Click

No right click