मनाचे श्लोक २१-३०

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सांडि रे द्रव्यदारा ॥

मना यातना थोर हे गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥२१॥

मना सज्जना हीत माझे करावे ।
रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥

महाराज तो स्वामि वायूसुताचा ।
जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥

न बोले मना राघवेंवीण कांही ।
जनी वाउगे बोलता सूख नाही ॥

घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पाहतो ॥२३॥

रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥

सदासर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनीं पापिणी ते नसो दे ॥२४॥

मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैंचा ॥

सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥

देहेरक्षणाकारणे यत्न केला ।
परी शेवटी काळ घेवोनि गेला ॥

करी रे मना भक्ती या राघवाची ।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥२६॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ॥

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरि कांबि वाजे ॥

पुरी वाहिली सर्व जेणे विमानी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२९॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा रामदासाभिम

Hits: 367
X

Right Click

No right click