कडबू

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
दोन वाट्या चण्याची डाळ, अडीच वाट्या गूळ अगर साखर, अेक लहानसा नारळ, अर्धी वोटी खसखस, अंदाजे तीन वाट्या कणीक, पाव वाटी बेदाणा, पाव वाटी बेदाणा, पाव वाटी काजूचे तुकडे

कृती :
चण्याची डाळ मऊ शिजवून घेऊन चाळणीत ओतून पाणी काढून टाकावे. नंतर डाळ यंत्राने अगर पाट्यावर साधारण भरड वाटून घ्यावी. नंतर त्यात साखर अगर गूळ व नारळाचे खोवलेले खोबरे घालून पुरण पुन्हा शिजवून घ्यावे. चांगला गोळा झाल्यावर खाली उतरवावे. त्यात वेलदोड्याच पूड, जायफळाची पूड, बेदाणा व काजूचे तुकडे घालावेत. तीन-चार चमचे खसखस वगळून बाकीची खसखस भाजून घालावी व पुरण सारखे करावे. कणकेमध्ये चवीपुरते मीठ व पाव वाटी तेल घालून कणीक घट्ट भिजवावी व चांगली मळून त्याच्या पुऱ्या करण्याकरिता गोळया करतात त्याप्रमाणे गोळया कराव्या. गोळी लाटावयास घेतेवेळी ती खसखशीत दाबून घ्यावी. पुरी लाटावी व खसखशीची बाजू सोडून दुसऱ्या बाजूवर पुरण घालावे व करंजीप्रमाणे बंद करून कातण्याने कातून तुपात कडबू खमंग तळून काढावा. (टीप- या कडबूत खवाही घालतात. खवा भाजून घेऊन तो पुरण शिजल्यावर, बेदाणा व काजू घालतेवेळी घालावा.
Hits: 423
X

Right Click

No right click