आलेपाक पोहे

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
अर्धा किलो पातळ पोहे, एक नारळ, सहा-सात ओल्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबू, कढीलिंब, आल्याचे एक इंच लांबीचे तीन तुकडे, मीठ, साखर, दोन-तीन सुक्या मिरच्या, एक चमचा उडदाची डाळ, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, दोन मोठे कांदे, फोडणीचे साहित्य.

कृती :
पोहे पातळ घ्यावेत. नंतर दोन वाट्या खोवलेले खोबरे व आल्याचा कीस पोह्यांत मिसळून पोहे दडपून ठेवावेत. दहा मिनिटे ठेवल्यावर त्यात मिरच्या वाटून, चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी व वर लिंबू पिळावे. तसेच हवे असल्यास अगदी बारीक चिरलेला कांदा व भाजलेले शेंगदाणे घालावेत. नंतर नेहमीप्रमाणे फोडणी करावी व त्यात उडदाची डाळ, सुक्या मिरच्या व कढीलिंब घालावा व ही फोडणी पोह्यात वरून द्यावी. कोथिंबीर बारीक चिरून वर घालावी व पोहे चांगले कालवावेत. तेलाच्याऐवजी तूप-जिऱ्याची फोडणीही ह्या पोह्यांना देतात. तसेच ह्या पोह्यांत डाळेही घालतात. आवडत असल्यास घालावे.
Hits: 519
X

Right Click

No right click