मिक्स डाळीचा ढोकळा

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
हरभराडाळ १००ग्रॅम, तूरडाळ ५० ग्रॅम, मूगडाळ ५० ग्रॅम, मसूरडाळ ५० ग्रॅम, उडीदडाळ १०ग्रॅम, तांदूळ १० ग्रॅम, ५ हिरव्या मिरच्या, ५ लसूण पाकळया, आले तुकडा १ इंच, मीठ२ चमचे, चहाचे ४चमचे साखर, चहाचे २ चमचे गोडेतेल, साधे इनो १ पाकीट, पिवळा रंग पाव चमचा

कृती :

सर्व डाळी पाण्यात स्वच्छ धुऊन पाच तास भिजवा. त्यानंतर मिक्सरवर खूप बारीक वाटा. साधारण १ कप पाणी लागेल. वाटण पातेलीत घालून घट्ट झाकण लावून ठेवा. दुसऱ्या दिवशी वाटलेली डाळ फुगुन येईल. वाटलेल्या डाळीत मिरच्या, लसूण, आले वाटून घाला. तसेच मीठ, साखर, गोडेतेल व थोडा पिवळा रंग घालून पीठ चांगले ढवळा. सर्वात शेवटी इनो घालून चांगले ढवळा व कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून १ इंच जाडीचा किंवा दीड इंच जाडीचा थर ओतून कुकरमध्ये पाणी घालून ते भांडे(पिठाचे) ठेवावे. घड्याळ लावून १५ मिनिटांत ढोकळा तयार होतो. गार झाल्यावर जिरे, मोहरी व हिंग, कढीलिंब यांची फोडणी करून ढोकळयावर ओतावी.

Hits: 436
X

Right Click

No right click