पाचक अन् पौष्टिक देठांचे सूप

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
लाल माठ, चाकवत, पालक, कोथिंबिर इ. ची देठे, वाटीभर गोड ताक, मीठ, साखर, तूप-हिंग-जिरे फोडणीसाठी व सजावटीसाठी/ चवीसाठी वाफवलेले मटार दाणे.

कृती :
 वरील सर्व देठे थोड्या पाण्यात उकडून घ्यावीत व मिक्सरमधून काढावीत. नंतर मीठ, साखर व ताक घालून उकळण्यास ठेवावे व सतत हलवावे. पाव चमचा तूप घेऊन खमंग फोडणी द्यावी. अंदाजे खर्च / किती माणसांना पुरेल : २ ते ३ रूपये - २ ते ३ माणसांना पुरते.
Hits: 437
X

Right Click

No right click