पालक सूप

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
१ मोठा टोमॅटो, १ ढब्बू मिरची, १ गाजर व १ जुडी पालकाची फक्त पानं, मीठ, मिरेपूड (जरा जाड असावी), अडीच टे. स्पून कणीक, दीड टे. स्पून लोणी

कृती :
४ ते ५ कप पाणी उकळा, गॅस कमी करून त्यात प्रथम बारीक चिरलेलं (किसलेलं) गाजर घाला. ५मिनिटांनी टोमॅटो, ढब्बू मिरची चिरून घाला. शेवटी पालक (धुऊन चिरून) घाला. कणीक व थोडं पाणी मिसळून पेस्ट बनवून घाला. मीठ, मिरेपूड, लोणी घाला. गरम गरम प्या. बरोबर सँडवीच टोस्ट इ. घ्या. यामध्ये भाज्या फार शिजवायच्या नाहीत. (ठेचलेलं आलं, हिरव्या मिरच्या ऐच्छीक)
Hits: 403
X

Right Click

No right click