डिंकाचे लाडू

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
पाव किलो डिंक,अर्धा किलो सुके खोबरे, अर्धा किलो खारीक, एक वाटी खसखस, पाव वाटी बदाम, एक किलो गूळ अगर साखर, बिब्ब्याच्या बिया, अर्धी वाटी साजूक तूप.

कृती :

साधारणपणे हरभऱ्याच्या डाळीअेवढा बारीक होईल इतपत डिंक जाडसर कुटावा. नंतर डिकंाला तुपाचा हात लावून तो उन्हात ठेवावा. खोबरे किसून भाजून घ्यावे. खारकांची पूड करून घ्यावी. खसखस भाजून घ्यावी. बदाम सोलून त्यांचे जाड काप करून घ्यावेत. बिब्ब्याच्या बिया तळून घ्याव्यात. किंवा तुपामध्ये तळून त्याच्या लाह्या करून घ्याव्या. थोडे तूप टाकून खारकांची पूड भाजून घ्यावी. नंतर साखरेचा अगर गुळाचा पक्का पाक करून त्यात अर्धी वाटी तूप घालावे. चांगले मिसळून घेऊन लाडू वळावे. हे लाडू गरमच वळावे लागतात. हे लाडू उपवासालाही चालतात. पाहिजे असल्याास वरील साहित्यात डिंकाचे प्रमाण वाढविण्यास हरकत नाही.

Hits: 426
X

Right Click

No right click