गुलाबजाम

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
५०० ग्रॅम गुलाबजामचा खवा, १ वाटी अगदी बारीक रवा, ७५० ग्रॅम साखर, अर्धा चमचा रोझ इसेन्स, ५ ते ७ वेलदोड्याचे दाणे, चिमूटभर सोडा

कृती :
गुलाबजामचा खवा गायीच्या दुधाचा केलेला असतो. त्यात सिग्धांग कमी असतो. खवा हाताने सारखा करा व मिक्सरमधून काढा. नंतर त्यात बारीक रवा व चिमूटभर खायचा सोडा घाला. मिश्रण मळून घ्या. मळताना हाताला थोडे बर्फाचे थंडगार पाणी लावून मळा. वरील मिश्रणाचे ५० गोळे करा. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करा. त्यात रोझ इसेन्स घाला. वरील प्रत्येक गोळयात वेलदोड्याचे २ दाणे घाला. गोल गोळे करा व तुपात तळून घ्या. नंतर लगेचेच पाकात टाका. गुलाबजाम पाकात टाकताना पाक गरम असावा. गुलाबजाम तळताना जरा काळजी घ्यावी लागते. तूप तापले की कढई खाली उतरवावी. त्यात ४-५ गुलाबजाम टाकावेत. झाऱ्याने तूप उडवावे. गुलाबजाम जरा फुलले की कढई गॅसवर ठेवावी. गॅस मध्यम असावा. कढई हलवून हलवून गुलाबजाम तळावेत. झाऱ्याने एकदा उलटावेत व जरा गडद रंगावर आले की काढावेत.
Hits: 413
X

Right Click

No right click