पेढे

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
एक किलो खवा, पाव किलो साखर, केशर अगर खाण्याचा केशरी रंग, पिस्ते, चारोळी

कृती :
खवा व साखर एकत्र करून मिसळावे व जाड बुडाच्या कढईत शिजवावयास ठेवावे. शिजत असताना सारखे घोटत राहावे. मिश्रणाची गोळी झाली की खाली उतरवावे व पुन्हा घोटत राहावे. साधारण गार झाल्यावर त्यात केशर अगर रंग व वेलदोड्याची पूड घालावी. नंतर खवा-साखरेचा गोळा ताटात काढून घेऊन मळावा. थोडे थांबून पुन्हा मळावे. याप्रमाणे पेढे वळण्याइतपत गोळा घट्ट होईपर्यंत थांबून थांबून मळावे. नंतर पेढे वळावेत व हवे असल्यास त्यावर पिस्त्याचे काप व चारोळी लावावी. हे पेढे बाजारी पेंढ्यापेंक्षा खमंग होतात व फिके असल्यामुळे खावयास चांगले लागतात.
Hits: 423
X

Right Click

No right click