फाल्गुन

Parent Category: मराठी संस्कृती Category: मराठी सण Written by सौ. शुभांगी रानडे
होळी :

फाल्गुन महिन्यातील सर्वात महत्वाचा सण होळी आहे. हा सण महाराष्ट्न्, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल इत्यादी ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यात येतो. या संदर्भात पौराणिक काळातल्या अनेक कथा आहेत त्यात प्रल्हादाची कथा प्रसिध्द आहे. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपु राक्षसाचा मुलगा. अतिशय विष्क्षुभक्त. त्याची परमेश्वराची भक्ती राजाला पाहवत नव्हती. त्याने प्रल्हादाला परावृत्त करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण यश आले नाही.

भक्त प्रल्हाद त्यात अधिकाधिक तल्लीन होत गेला. हिरण्यकश्यपुची बहिण धुडां राक्षशीण. ही अग्नीत जळणार नाही असा तीला वर होता. धुंडेने राजाला सुचविले की मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही. प्रल्हाद मात्र जळून जाईल.

हिरण्यकश्यपुला हे मान्य झाले. लाकडे व गोवऱ्यांची होळी रचण्यात आली. त्यात धुंडा राक्षसीणीसह प्रल्हादाला बसवून होळी पेटविण्यात आली. भक्त प्रल्हादाच्या असीम भक्तीमुळे प्रल्हाद जिवंत राहीला व धुंडा राक्षसीण मात्र तिच्या दृष्ट इच्छेमुळे जळून गेली. या प्रसंगाची आठवण म्हणून प्रतीवर्षी होळी साजरी करण्यात येते.

अग्नीला शांत करण्याच्या उद्देशानेही होळी हा सण साजरा करण्यात येतो. फाल्गुन पौणिमेच्या दिवशी सायंकाळी आपल्या घरासमोर सडा सारवा करून, रांगोळी घालून, लाकडे गोवऱ्या पेटवून होळी साजरी करावी व होळीची पुजा करून नारळ आत टाकावे. जुन्या वाईट चालीरिती, अंधश्रध्दा, अप्रवृत्ती यांचा नाश करून नवीन विचारसरणी, बंधुभाव वाढवला पाहिजे हा या सराचा उद्देश आहे. धुलीवंदन हा सण होळी ते रंगपंचमी या दरम्यान संपूर्ण देशात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात येतो.

या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळून, रंग लावून आनंदोत्सव साजरा करतात. वसंत ऋतुच्या आगमनाचे स्वागत करतात. एकमेकात प्रेम व बंधुभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सण साजरा करण्यात येतो. उत्तर प्रदेशात भगवान श्रीकृष्णाच्या मथुरेमध्ये हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.

 

Hits: 658
X

Right Click

No right click