| पी हळद हो गोरी - उतावळेपणा दाखविणे |
| बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर - दोनपैकी एक पर्याय निवडणे |
| मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही - प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही |
| चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच |
| आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे |
| उंटावरचा शहाणा - मूर्ख सल्ला देणारा |
| अडला हरी गाढवाचे पाय धरी - अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते |
| नाचता येईना अंगण वाकडे - स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो |
| तेरड्याचा रंग तीन दिवस - एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे |
| तोंड दाबून बुक्क्यांचा मार - विनाकारण जुलूम सहन करावा लागणे |
| नावडतीचे मीठ अळणी - नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही |
| नव्याचे नऊ दिवस - नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही |
| दुष्काळात तेरावा महिना - संकटात अधिक भर |
| अंथरूण पाहून पाय पसरावे - ऎपत पाहून खर्च करवा |
| छत्तीसाचा आकडा - विरुद्ध मत असणे |
| एका हाताने टाळी वाजत नाही - दोष दोन्हीकडे असतो |
| काखेत कळसा गावाला वळसा - वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे |
| पालथ्या घड्यावर पाणी - सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे |
| वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो |
| रात्र थोडी सोंगे फार - काम भरपूर, वेळ कमी |
| अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपणाने नुकसान होते |
| शेरास सव्वाशेर - प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ |
| नाकाचा बाल - अत्यंत प्रिय व्यक्ती |
| पायीची वहाण पायी बरी - योग्यतेप्रमाणे वागवावे |
| नाकापेक्षा मोती जड होणे - डोईजड होणे |
| आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही बाजूंनी अडचण |
| कामापुरता मामा - काम साधण्यापुरते गोड बोलणे |
| आधी पोटोबा मग विठोबा - अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे |
| वरातीमागून घोडे - एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे |
| पाण्यात राहून माशाशी वॆर - बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे? |
| गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते |
| घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे |
| डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे |
| भरंवशाच्या म्हशीला टोणगा - पूर्ण निराशा करणे |
| खायला काळ भुईला भार - ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो |
| तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले - दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे |
| हपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते |
| कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे |
| नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी पण कृती छोटी |
| कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात |
| कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही |
| उंटावरून शेळ्या हाकणे - आळस, हलगर्जीपणा करणे |
| मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये |
| झाकली मूठ सव्वा लाखाची - दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत |
| गर्जेल तो पडेल काय? - पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही |
| टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही - कष्टाशिवाय यश मिळत नाही |
| वारा पाहून पाठ फिरवावी - वातावरण पाहून वागावे |
| कुंपणानेच शेत खाणे - रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे |
| दगडावरची रेघ - कायमची गोष्ट |