७१. परळी वैजनाथ १९९८

द. मा. मिरासदार<p>आपल्याला आपल्याच भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण झाला असून, आम्ही मराठी माणसेच आमच्या भाषेचे खरे शत्रू आहोत.आपणच मराठीला तुच्छ लेखतो, झिडकारतो, गौण मानतो, त्यामुळे तिला मानाचे स्थान कोण देणार ? आपला जास्तीत जास्त व्यवहार हा मराठीतून व्हावा, ही आमची इच्छाशक्तीच नाहिशी झाली आहे. मातृभाशेतून व्यवहार करणे आपल्याला कमीपणाचे, गावंढळपणाचे वाटते, तेव्हा मराठीला प्रतिष्ठा मिळणार कशी ? संस्कृतीचे सत्व म्हणजे भाषा असते.  आम्ही आमची राजकीय गुलामगिरी संपविली परंतु आपण अजूनही इंग्रजांची सांस्कृतिक गुलामगिरी भूषण म्हणून मिरवीत आहोत.

Hits: 329
X

Right Click

No right click