४७. १९६७ भोपाळ - डॉ. वि. भि. कोलते
Category: संमेलने ४१-५०
महानुभाव वाङ्मयाचे संशोधक असणार्या डॉ. कोलते यांच्या मते साहित्याचे प्रमुख कार्य म्हणजे जीवनाच्या बाह्यदर्शनाबरोबरच मानवी मनातील विकारांची आंदोलने कलात्मक रीतीने चित्रित करणे हे होय. मनातील गुंतागुंतीच्या विकारांची जाणीव आणि आविष्कार जितका सूक्ष्म तितकी साहित्याची खोली अधिक. साहित्य नुसते व्यापकच झाले पाहिजे असे नाही तर ते खोलही व अगाधही झाले पाहिजे. त्यासाठी अथांग मानवी मनात जेवढी खोलवर बुडी मारता येईल तेवढी मारली पाहिजे.
Hits: 574