२२. जळगाव १९३६ - माधव त्र्यंबक पटवर्धन
Category: संमेलने २१-३०
मराठी असे आमुची मायबोली’ असे म्हणणारे रविकिरणमंडळाचे एक श्रेष्ठ कवी. मराठी भाषेवर नितांत प्रेम करतात. ते म्हणतात भाषाशुद्धिवादी इंग्रजीचा वा अरबीफार्सीचा द्वेष करीत नाहीत. ते स्वभाषेवर अधिक प्रेम करतात. परभाषेतील शब्दांची कुरघोडी आपण आपल्या विपर्यस्त व अभिमानशून्य मनोवृत्तीमुळे करून घेत आलो. तिच्या ओझ्याखाली कित्येक मराठी शब्द नि वाक्प्रचार मेले आहेत आणि कित्येकांचा जीव जात आहे, म्हणून ती आता नकोशी झाली आहे.
Hits: 424