१५. बेळगाव १९२९ - शि. म. परांजपे

 

भाषेतील शब्दसंपत्ती व ग्रंथसंपत्ती वाढेल असाच आपला प्रयत्न असला पाहिजे. काही परकीय शब्द आपल्या भाषेतील शब्दसंपत्ती वाढविण्यास साधनीभूत होत असतील तर त्यांना धक्के मारून आपल्यातून घालविण्यात आपण आपल्या भाषेचा काही फायदा करीत आहो, असा मुळीच अर्थ होत नाही. संस्कृत भाषा ही आपल्या मराठी भाषेच्या साम्राज्याच्या ताब्यातील एक सोन्याची खाण आहे. या खाणीतील सोन्याने आपण आपल्या भाषासुंदरीच्या अंगावर कितीतरी सुवर्णालंकार घातलेले आहेत. अजूनही लागेल तित्के सोने आपल्याला काढता येण्यासारखे आहे. मराठी भाषेमध्ये फारसे संस्कृत शब्द न वापरता साधे व सोपे असे लहान लहान मराठी शब्दच वापरावे असे काही लोक प्रतिपादन करतात व त्याप्रमाणे क्वचित कोणी हे तत्व आचरणातही आणतात. परंतु प्रत्येक भाषेवर आपण बहिष्कार घालू लागलो तर आपली शब्दसंपत्ती अगदीच दारिद्र्यावस्थेला जाऊन पोहोचेल हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

Hits: 395
X

Right Click

No right click