बाळराज

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - २.आप्त Written by सौ. शुभांगी रानडे

वाट पाहताना आज , डोळे शिणले गं माझे
येणार बाळराज ,आज घरी ----- १

डोळा मिटेना मिटेना, नीज येईना नयना
किती करु आराधना, देवराया ----- २

आत बाहेर तरी, किती करु येरझारी
भांडे पालथे हे दारी, घातले गं ----- ३

कधी पाहीन बाळास, हीच एक लागे आस
मनी बोलले नवस, नारायणा ----- ४

हासे गुलाब केवडा , पारिजाताचा गं पडे सडा
दारी पाहता गं खडा, बाळराज ----- ५

Hits: 150
X

Right Click

No right click