चार शब्द
चार शब्द मी कथिते बाई ऽ ऽ ऽ
प्रेमभरे तू ऎकूनि घेई . . .
भाग्यवान तू सखये खरी बाळजन्म परदेशी
भाग्यवान ते बाळ आपुले जन्मे जे तुझ्या कुशी
मातपित्यांच्या सुसंस्कारे बालक गुणी होई
ठाऊके तुज हे सारे तूही गुणी असशी बाई
गुणी असशी बाई
चार शब्द मी कथिते बाई ऽ ऽ ऽ
प्रेमभरे तू ऎकूनि घेई . . . १
आई होण्याच्या महानुभवाचा आनंद तूही घेई
दुग्धावरल्या सायीसाठी माहेर तुजघरी येई
वंशदिवा हा घेऊनि नवा प्रकाश येईल हाती
काळजी कसली नको करू तू देव असे तो पाठी
देव असे तो पाठी
चार शब्द मी कथिते बाई ऽ ऽ ऽ
प्रेमभरे तू ऎकूनि घेई . . . २
भावनांच्या कल्लोळांनी मन हे भरूनि जाई
आवर त्यासी घालायाला नयनी आसवे येती
निवास जरी दूर तरी मन हे तुझ्याचपाशी
आशीश देते येथूनि तुला बाळाची तुझ्या गं आजी
बाळाची तुझ्या गं आजी
चार शब्द मी कथिते बाई ऽ ऽ ऽ
प्रेमभरे तू ऎकूनि घेई . . . ३
Hits: 137