१९. बेचाळीसचा लढा

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१९, बेचाळीसचा लढा
अंमळनेरला गुरुजी गुपचूपपणे आले. एका मित्राकडे वळकटी टाकली. देशातल्या समाजवादी मंडळींनी भूमिगत राहून लढा लढविण्याचे ठरविले होते. त्यानुसार देशात उठाव होऊ लागले होते. गुरुजींनी अंमळनेरमध्येही काही घडावे, असे प्रयत्न गुप्तपणे चालु ठेवले, अंमळनेर अजून कसे पेटत नाही, या विचाराने ते बेचैन बनले. तशाच मनःस्थितीत ते पुण्यास आले. येताना तेथील तरुणांसाठी एक चिठ्ठी लिहुन ठेवली. गुरुर्जीनी लिहिले होते, "अशा गंभीर प्रसंगी माझा खानदेश शांत का ? अंमळनेरची जनता जर काहीच करणार नसेल तर ह्या अंमळनेरच्या पाच कंदिलांसमोर मी माझ्या शरीराची होळी करीन,”

गुरुजींची ही चिठ्ठी तरुण कार्यकर्त्यांनी वाचली मात्र, ते पेदून उठले. अमळनेरमध्ये सर्वत्र ही वार्ता पसरली, प्रक्षुब्ध लोकांचा जमाव गोळा झाला. तिथे ही गुरुजींची ही चिठ्ठी वाचण्यात आली. गुरुजींचा आदेश लोकांनी शिरोधार्य मानला.
जवळच मामलेदारांचा टांगा उभा होता, लोकांनी तो पेटवून दिला. पोलीस चौकी, पोस्ट ऑफिस, कोर्ट, स्टेशन बघता बघता परकी साम्राज्याच्या ह्या खुणा आगीने धडाडू लागल्या. खानदेशात क्रांतीची ज्वाळा भडकली!
मुंबई-पुण्यात आल्यावर गुरुजींचा एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, शिरुभाऊ लिमये, ना. ग, गोरे आदी समाजवादी मित्रांशी संबंध आला. भूमिगत अवस्थेत गुरुजी सातारा, खानदेश आदी भागात जाऊन आले. कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेऊन त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. लढ्यासाठी स्फूर्ती, प्रेरणा दिली. मुंबईत गुरुजी भूमिगतांबरोबरच राहत असत. त्यांच्यासाठी स्वयंपाक करीत असत. त्यांना मायेने जेवू-खाऊ घालीत असत. 'संतवाडी', "राजगड, 'हडळ
हाऊस', 'मूषक महाल' अशी त्या काळातल्या धूमिगतांच्या निवासस्थानांची खुणेची नावे होती. प्रवासाच्या वेळी गुरुजी कधी थोतर, कोट, उपरणे, पगडी असा एखाद्या शेटजीसारखा पोशाख करीत, कधी पैरण-मुंडासे, घोंगडी असा शेतकरी वेष धारण
करीत. गुप्तपणे सभा भरवीत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत. मुंबईत असले म्हणजे, राहत्या जागेची झाडलोट करणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे, भांडी घासणे ही कामेही ते करीत असत. एकदा तर डॉक्टरांच्या वेषात असलेल्या जयप्रकाशजींनाही गुरुजींनी रांधून जेवू घातले होते.

या क्रांतिकाळात गुरुजींनी भूमिगत असताना पुस्तके लिहूनही पैसे जमा केले आणि चळवळीसाठी कार्यकर्त्यांना दिले. 'गोड गोष्टी'चे ६ ते १० हे पाच भाग याच वेळी त्यांनी लिहिले. 'देशबंधू चित्तरंजन दास', 'विनोबाजी' अशी छोटी चरित्रेही लिहिली आणि मुख्य म्हणजे त्यांनी या काळात अनेक प्रकारची जळजळीत, तेजस्वी बुलेटिन्स लिहिली. ही बुलेटिन्स चक्रमुट्रित होऊन ठिकठिकाणी गुप्तपणे जात असत. गुप्तपणेच त्यांचे वाटप होत असे. क्रांतीचा संदेश त्यात असे. गुरुजींनी
लिहिलेल्या अशाच एका बुलेटिन्सचा हा थोडा नमुनाच पहा.

“स्वतंत्र महाराष्ट्र बलिदान पत्रिका' असे शोर्षक असलेल्या या पत्रिकेत म्हटले आहे, "९ ऑगस्टला हिंदी स्वातंत्र्य संग्राम हिंदुस्थानभर सुरू झाला. ब्रिटिश हिंदुस्थान व संस्थानी हिंदुस्थान असा प्रश्‍न उरला नाही. संस्थानेही उठली. श्रीशिवछत्रपतींशी संबद्ध असे कोल्हापूर संस्थानही बंड करून उठले. कोल्हापूर प्रजापरिषदेने पुढील तेजस्वी जाहीरनामा काढला. इंग्रजांची व इंग्रजी सत्तेच्या तंत्राने चालणाऱ्या संस्थांनी सरकारची सत्ता यापुढे आम्ही मानणार नाही. आम्ही स्वतंत्र आहोत!”

“१५ ऑगस्टला थोर महादेवभाई स्वर्गवासी झाले. १६ ऑगस्टला कोल्हापुरात प्रचंड मिरवणूक. ते पहायला पोलीस आले. लाठीमार सुरू झाला आणि बिंदुनारायण यांचे डोके शतचूर्ण झाले. जनतेत चैतन्यसिंधू उचंबळावा म्हणून बिंदुनारायणने
स्वत:चा जीवनबिंदू अर्पण केला आणि खरोखरोच करवीर जनता पेटली. शेकडो तुरुंगात चालले. हजारोंना झळा लागल्या...
स्वातंत्र्यवाद्यांनो, उठा, प्रचार करा! उठाव करा!”

“हे हरमखोर सरकार, नाही जिवंत आम्ही ठेवणार ! असे गर्जत गावोगाव जा. स्वातंत्र्याच्या शपथा घेणाऱ्यांच्या साहाय्याने पथके तयार करा. आता बसू नका. आपले वर्तुळ वाढवा. संघटना वाढवा,”

“शाळांतील अध्यापकांनो, कॉलेजातील प्राध्यापकांनो, बंद करा ह्या संस्था ! काय त्यात राम आहे? या खुनी सरकारचे पोलीस तुमच्या आवारात आलेले तुम्हांस कसे बघवते? तुम्ही आपल्या दगडी संस्थांना जपता, पण त्यामुळे भारतमातेला
मारीत आहात. तुम्ही मातृहत्यारे होणार का? पडा बाहेर. तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी स्वातंत्र्याचा संदेश देत सर्वत्र हिंडा. 'सा विद्या या विमुक्तये!' तेच खरे ज्ञान, जे स्वतंत्र करते!”

आपल्या प्रिय खानदेशातल्या शेतकऱ्यांना उद्देशून लाल शाईत लिहिलेले असेच एक पत्रक त्या वेळी गुरुजींनी काढले होते. 'क्रांतीच्या मार्गावर' नावाचे व पुस्तकही लिहिले होते.

१० फेब्रुवारी १९४३ रोजी गांधीजींनी आगाखान पॅलेस येथील बंदिवासातून २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. ब्रिटिश सरकारने गांधीजींवर काही खोटे आरोप केले होते. त्याविरुद्ध हे उपोषण होते. सारे राष्ट्र चितामग्न झाले होते. निर्घृण ब्रिटिश
सरकारने तर गांधीजींच्या अंत्यविधीची तयारी चालविली होती. अशा वेळीच जयप्रकाशजींच्या सांगण्यावरून गुरुजींवर 'गांधीजी गेले. असे समजून मृत्युलेख लिहिण्याची' ही पाळी आली होती. कर्तव्य कठोर असते. गुरुजींनी डोळ्यांतून
अश्रूंचा पूर वाहत असताना तो लेख लिहिला. जनतेला पुढला रस्ता दाखवणेही आवश्यक होते.

सुदैवाने गांधीजी या अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर पडले!

१८ एप्रिल १९४३ रोजी 'मूषक महाला'वर पोलिसांनी धाड घातली. त्या वेळी साने गुरुजी, शिरुभाऊ लिमये, ना. ग. गोरे आदी १४ भूमिगत कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. गुरुजींचे सुमारे सात-आठ महिन्यांचे भूमिगत जीवन संपले आणि ते येरवड्याच्या कारागृहात दाखल झाले. गुरुजी तेथे जाताच तरुणांचा घोळका त्यांच्याभोवत्ती जमा झाला. त्यांना गोष्टी सांगणे, धीर देणे, दुखले-खुपले पहाणे, हे सर्व आईच्या वात्सल्याने गुरुजी करू लागले. गप्पागोष्टी, विनोदही चालत असत. त्यामुळे कारावासातील कंटाळवाणे जीवन सुखकर होते असे. गुरुजींनी एकदा नाटक लिहिले आणि तरुणांनी त्याचा प्रयोगही केला. टिळक पुण्यतिथीला न लोकमान्यांच्या जीवनावर गुरुजींनी सुरेख कीर्तनही केले. पुस्तक-लेखन तर गुरुजींचे वेळ मिळेल तसे चालूच असे.

येरवड्याहून गुरुजींना पुढे नाशिकच्या कारागृहात नेले होते. तिथेही गुरुजींचा हाच उपक्रम चालू असे. 'मानवजातीची कथा', 'इस्लामी संस्कृती', 'चिनी संस्कृती' असे काही महत्त्वाचे ग्रंथलेखन गुरुजींनी नाशिकला केले.

१५ जानेवारी १९४५ रोजी गुरुजींची नाशिकच्या कारागृहातून सुटका झाली. सुटल्याबरोबर प्रथम ते ठाणे जिल्ह्यातील बोर्डी गावी आपल्या बंधूंकडे गेले. मध्यंतरी ते खानदेशातही जाऊन आले. बर्‍याच दिवसांनी कार्यकर्त्याच्या गाठीभेटी झाल्या.

१९४२ची ऑगस्ट क्रांती आता ओसरली होती आणि बहुतेक नेते मंडळी व कार्यकर्ते तुरुंगातून सुटले होते. गुरुजी काही काळ बोर्डीला राहिले आणि नंतर 'ऑगस्ट क्रांतीचे संकीर्तन' गात महाराष्ट्रभर फिरले. ऑगस्ट क्रांतिवाद्यांवर हिंसाचाराचा आरोप करून काही बुजुर्गानी त्यांना बदनाम करण्याचा उपदूव्याप चालवलेला होता. गुरुजींना हे सहन झाले नाही. त्यांनी या क्रांतिवीरांची प्रशस्ती करीत त्या

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 92
X

Right Click

No right click