गीताई अध्याय सतरावा
अर्जुन म्हणाला
जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती ।
त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥
श्री भगवान् म्हणाले
तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी ।
ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस ॥ २ ॥
जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे ।
श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा सा चि तो ॥३॥
सत्त्व-स्थ पूजिती देव यक्ष-राक्षस राजस ।
प्रेते आणि भुते-खेते पूजिती लोक तामस ॥ ४ ॥
शास्त्रे निषेधिले घोर दंेभे आचरिती तप ।
अभिमानास पेटूनि काम-रागे बळावले ॥ ५ ॥
देह-धातूंस शोषूनि मज आत्म्यास पीडिती ।
विवेक-हीन जे त्यांची निष्ठा ती जाण आसुरी ॥ ६ ॥
आहारांत हि सर्वाच्या तीन भेद यथा-रुचि ।
तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐक ते ॥७ ॥
सत्त्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी ।
रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥ ८ ॥
खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक ।
दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥ ९ ॥
रस-हीन निवालेले शिळे दुर्गध-युक्त जे ।
निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन ॥ १० ॥
फल्राभिलाष सोडूनि कर्तव्य चि म्हणूनिया ।
विधीने मन लावूनि होय तो यज्ञ सात्त्विक ॥ ११ ॥
फळाचे अनुसंधान राखुनी दंभ-पूर्वक ।
लोकांत यजिला जाय जाण तो यज्ञ राजस ॥ १२ ॥
नसे विधि नसे मंत्र अन्नोत्पत्ति नसे जिथे ।
नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज तामस ॥ १३ ॥
गुरू-देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य-संग्रह ।
अहिंसा क्रजुता अंगी देहाचे तप बोलिले ॥ १४ ॥
हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे ।
स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले ॥ १५ ॥
प्रसन्न-वृत्ति सोम्यत्व आत्म-चिंतन संयम ।
भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले ॥ १६ ॥
तिहेरी तप ते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी ।
समत्वे फळ सोडूनि घडले जाण सात्त्विक ॥ १७ ॥
सत्कारादिक इच्छूनि केले जे दंभ राखुनी ।
ते चंचळ इथे जाण तप राजस अस्थिर ॥ १८ ॥
दुराग्रहे चि जे होय अंतरात्म्यास पीडुनी ।
किंवा जे पर-घातार्थ जाण तामस ते तप ॥ १९॥
देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता ॥
धर्म-भावे चि जे देणे जाण ते दान सात्त्विक ॥ २० ॥
उपकार अपेक्षूनि अथवा फळ वांछूनी ।
क्लेश-पूर्वक जे देणे जाण ते दान राजस ॥ २१ ॥
कर्राने भावना तुच्छ देशादिक न पाहता ।
अनादरे चि जे देणे जाण ते दान तामस ॥ २२ ॥
ऊ-तत्-सत् ह्यापरी ब्रहम तिहेरी स्मरले असे ।
त्यांतूनि निमिले पूर्वी वेद यज्ञ उपासक ॥ २३ ॥
म्हणूनि आधी अकार उच्चार्राने उपासक ।
यज्ञ-दान-तपे उक्त निरंतर अनुष्ठिती ॥ २४ ॥
तत्-कार-स्मरणे सर्व तोडूनि फलर-वासना ।
नाना यज्ञ तपे दानेकरिती मोक्ष लरक्षुनी ॥ २५ ॥
सत्-कार-स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता ।
तशी सुंदरता कर्मी सत्-कारे बोलिली असे ॥ २६ ॥
यज्ञ-दान-तपे किंवा कर्मे जी त्यांस साधक ।
वागणे ह्यापरी त्यांत सत-कार-फळ बोलिले ॥ २७ ॥
यज्ञ दाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली ।
बोलिली सर्व ती मिथ्या दोन्ही लोकांत निष्फळ ॥ २८ ॥
अध्याय सतरावा संपूर्ण
Hits: 126